‘काका-पुतणे आधीपासूनच….’; ‘या’ बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

On: May 15, 2025 10:39 AM
Ajit Pawar Statement
---Advertisement---

Sharad Pawar & Ajit Pawar | गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (AJit Pawar) यांच्या गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः, गेल्या महिन्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र दिसल्यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांना वेग :

दोन दिवसांपूर्वीच, एका सहकार परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित होते. या वेळी शरद पवार यांनी अजित पवारांच्या कानात काहीतरी गुफ्तगू केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणाच्या चर्चांना आणखी वेग आला आहे. अशातच, प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही नेते आधीपासूनच एकत्र आहेत आणि त्यांच्याकडे यासंदर्भात अनेक पुरावे आहेत.

बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वीच असे विधान केले होते की, राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार कधीही एकमेकांपासून दूर झालेले नाहीत. ते आतून एकच आहेत. “खरं तर, शरद पवार आणि अजित पवार हे दोघे कधीही एकमेकांपासून दूर झाले होते, याची मला तरी खात्री होत नाही. (Sharad Pawar & Ajit Pawar)

आता दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे, मात्र हे केवळ सत्तेसाठी चालले आहे, असे वाटते. परंतु दोन्ही पक्ष पुन्हा एक आले काय, किंवा नाही आले काय? यामुळे सामान्य जनतेला काही फरक पडत नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. आता त्यांनी दोन्ही नेते एकत्र असल्याचे पुरावे असल्याचा दावा केला आहे.

Sharad Pawar & Ajit Pawar | शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? :

बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी म्हटले की, “शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज काय? कारण ते आधीपासून एकत्र आहे. (Sharad Pawar & Ajit Pawar)

यासंदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत. जशी चाणक्य नीती आहे, तशी पवार नीती आहे,” असे म्हणत बच्चू कडू यांनी दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. येणाऱ्या काळात शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

News Title: Uncle-Nephew Already Together, I Have Many Proofs; Bacchu Kadu’s Claim Creates Stir

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now