पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

On: November 23, 2024 6:46 PM
Uddhav Thackeray revelation about meeting with Amit Shah and Devendra Fadnavis in 2019  
---Advertisement---

Uddhav Thackeray | महाविकास आघाडीला 50 पेक्षाही कमी जागांवर यश मिळताना दिसत आहे. या निकालावर शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाविकास आघाडीला प्रामाणिकपणे मतदान केलेल्या नागरिकांचे आभार मानले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभेचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणालेत.

जे जिंकले त्यांचं अभिनंदन करतो. ज्यांनी प्रामाणिकपणे आघाडीला मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. जणू काही लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं दिसतं. सर्व सामान्य जनतेला पटला की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली आहे.

एक दीड वर्षापूर्वी भाजपचे तूर्तास असलेले अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते, एकच पक्ष राहील. म्हणजे त्यांना वन नेशन वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय अशी भीतीदायक चित्र आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यभर आम्ही फिरलो. हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मते का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का. कापसाला भाव नाही म्हणून दिली का?राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहे त्यासाठी दिले का. महिलेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली त्यासाठी मते दिली का. कळत नाही,. प्रेमापोटी नाही पण रागापोटी अशी ही लाट जणूकाही उसळली हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय आहे. यामागचं गुपित काही दिवसात शोधावं लागणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ कारणांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला!

‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं

लातूर शहरात मोठी उलथापालथ; देशमुख कुटुंबाला मोठा धक्का

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर

राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरेंचा दारूण पराभव

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now