Uddhav Thackeray | ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (29 सप्टेंबर) नागपूर येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाडकी बहीण योजनेवरून देखील त्यांनी तिखट सवाल केले.
“गद्दारांना 50 खोके आणि आम्हाला फक्त 1500 रुपये असं महिला सांगतायेत. 2014 ला मोदी यांचा आम्ही प्रचार करत होतो. 15 लाख देणार होते. त्याचे 1500 का झाले?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पुढे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील भाष्य केलं.
नागपुरात उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
“लोकसभा जिंकली आता विधानसभा जिंकायची आहे. परंपरेनं दसरा मेळावा घेणार, त्यानंतर मी महाराष्ट्र फिरणार आहे. बऱ्याच वर्षांनी इथे आलोय. मीडियाला काम करु द्या, त्यांच्यामुळे दिल्लीचे ठग आपल्याला ऐकतील. आपल्या दैवताच्या पुतळ्यांचं अनावरण करण्यासाठी मला बोलवलं, त्यासाठी आपले धन्यवाद”, असं उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) म्हणाले.
पुढे त्यांनी सिनेट निवडणुकीवरुनही टोलेबाजी केली. “दोन वर्षे सिनेटची निवडणुक पुढे ढकलली. ईव्हीएम नव्हतं म्हणून सीनेटच्या निवडणुकीत अभाविपला कमी मतं मिळाली.”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने दणदणीत विजय मिळविला आहे. यातून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं आदित्य ठाकरे यांनी दाखवून दिलं.
“वाऱ्याने तुमची दाढी हलत नाही..”
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मालवण येथील शिवरायांच्या पूतळ्यावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ” मालवनमघ्ये झालं ते लाजीरवानं होतं. निवडणूक जिंकायची होती. शिवरायाच्या पुतळ्याचे पैसे खाल्ले. समितीचा रिपोर्ट आलाय. आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणाले वाऱ्याने पुतळा पडला. वाऱ्याने तुमची दाढी नाही हालत.”, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला.
News Title : Uddhav Thackeray target cm eknath shinde
महत्वाच्या बातम्या –
आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात करण्याचा डाव होता?, कुणी केला दावा?
आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?, वाचा राशीभविष्य
मोठी बातमी! आमदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला
एमसी स्टॅनबाबत धक्कादायक बातमी समोर, ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ
लाडक्या बहिणींनो! तुमची प्रतिक्षा संपली, पाहा तिसरा हप्ता आला की नाही?






