Uddhav Thackeray | नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 20 च्या पुढचा आकडाही गाठता आला नाही. या निकालानंतर अनेक नेत्यांनी त्यांची साथ सोडल्याचं दिसून आलं. अशात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी एक बातमी समोर आलीये.नाशिकमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिलाय. (Uddhav Thackeray)
नाशिकमध्ये एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसलाय. नाशिक हा ठाकरेंच्या शिवसेनेचा गड मानला जात होता.
नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला खिंडार
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाझे यांनी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. तर, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात महायुतीने प्रभावी कामगिरी करून दाखवली. अशात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एसटी कामगार सेनेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी एसटी कर्मचारी सेनेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीवर प्रभावित होऊन आपण प्रवेश केल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसलाय. निवडणुकी दरम्यान आणि निवडणुकीनंतरही अनेक शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. ठाकरे यांच्या पक्षाला अजूनही गळती सुरू असल्याचंच चित्र यातून सध्या तरी दिसून येतंय. (Uddhav Thackeray)
News Title : Uddhav Thackeray party activist join Shinde group
महत्वाच्या बातम्या –
आज सोमवती अमावस्या, भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!
संतोष देशमुख प्रकरणाला नवं वळण, राष्ट्रवादीची युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणेचं काय कनेक्शन?
मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं नाव आल्याने मोठी खळबळ
“वाल्मिक कराड रोज 1 कोटी घरी घेऊन जायचा, पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा”
‘हातपाय तोडायची सुपारी पण…’; सतीश वाघ हत्याकांड प्रकरणातील धक्कादायक खुलासा समोर!






