Uddhav Thackeray | महायुतीचं जागावाटपाचं गणित हे जवळपास पक्कं झालं आहे. भाजपने नुकतीच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 99 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून शिवसेना ठाकरे गट आणि कॉँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाल्याचं बोललं जातंय. मविआ आज पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकमांडकडून मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. (Uddhav Thackeray )
अशात ठाकरे गटाचे 53 उमेदवार हे निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. ठाकरे गटाकडून आतापर्यंत 53 उमेदवारांना ग्रीन सिग्नल मिळाल्याचे समोर येत आहे.
उद्धव ठाकरे गट 96 ते 98 जागा लढण्याची शक्यता
मविआमध्ये ठाकरे गट 96 ते 98 जागा लढणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत, त्यांचा सर्वे देखील करण्यात आल्याचं बोललं जातंय. अशाप्रकारे एकूण 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. (Uddhav Thackeray )
आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला तिकीट मिळणार याचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे गट आणि कॉँग्रेस यांच्यातील वादावर देखील तोडगा काढण्यात आला आहे. संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाने काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केली होती. त्यानंतर मविआत समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे.आज थोरात आणि शरद पवार हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, आज 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आतापर्यंत भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच, मनसेकडून देखील काल दोन उमेदवारांची घोषणा झाली. वंचितने देखील यादी जाहीर केली आहे. (Uddhav Thackeray )
News Title : Uddhav Thackeray group 53 candidates confirmed
महत्वाच्या बातम्या –
पुणेकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी! आता यापुढे रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत…
दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास
ये रिश्ता क्या केहलाता है?, रात्री 12च्या ठोक्याला दिलेल्या शुभेच्छांची खमंग चर्चा!
पुण्यात सापडलेलं 5 कोटी घबाड कुणाचं?; संजय राऊत म्हणाले,’काय झाडी..काय डोंगर’
मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त






