महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना ‘इतके’ पैसे मिळणार!

On: November 9, 2024 4:39 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी नांदेडच्या लोहामध्ये आयोजित केलेल्या प्रचारसभेत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा असा टोला महायुतीला लगावला आहे.

लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार? :

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाडक्या बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर मला आर एस एसला मला विचारायचं आहे, गेली 100 वर्ष झाले तुमच्या संघटनेला पण तुम्ही आत्तापर्यंत काय केलं? तर आता त्यांना कळालं राज्यातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हव. त्यामुळे आता माता भगिनीला 1500 रुपये द्यायला पाहिजे.

परंतु नागरिकांनो पंधराशे रुपयांमध्ये तुमचं घर चालणार आहे का? तर तुमचे 1500 रुपये महत्त्वाचे आहेत की, महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे जर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर आम्ही महिलांना 3000 देणार आहोत असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Maharashtra l नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपली शिवसेना चोरली, या चोरांच्या व गद्दारांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय शिवसेनेनं नांदेडमध्ये खूप मेहनत केली आहे. तसेच वसंतराव मला भेटले देखील होते, तेव्हा त्यांनी नांदेडमध्ये मला सभा घेण्याची विनंती देखील केली.

मात्र दुर्दैवानं ते आता आपल्यात नाहीत. पण आता वसंतराव यांचा वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीला माझं आव्हान आहे, त्यामुळे आमचे उमेदवार तुम्ही निवडून आणा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

News Title –  Uddhav Thackeray criticizes government over Ladki Bahin Yojana

महत्त्वाच्या बातम्या-

राजकारण ‘या’ भाजीसारखं झालं आहे… बड्या नेत्यानी सर्वच पक्षांना घेरलं!

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

ईडीची मोठी कारवाई! ‘या’ सोसायटीची 333 कोटींची मालमत्ता जप्त

‘गरिबांना पक्क घर देणार’; अकोल्याच्या सभेत PM मोदींची घोषणा

“अजित पवारांच्या आमदारानं शरद पवारांना नोटीस पाठवली”; नव्या आरोपांनी खळबळ

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now