नवीन राजकीय समिकरणं जुळणार? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन; ‘या’ विषयावर झालं बोलणं

On: December 12, 2024 3:02 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray l राज्यात विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली आहे. अशातच या निवडणुकीमध्ये महायुतीने बाजी मारली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागली आहे. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

ठाकरेंनी फडणवीसांना केला फोन :

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता अशी माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरुन शुभेच्छा देखील दिल्या होत्या.

याशिवाय उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे अभिनंदन देखील केले होते. तसेच शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोनवरून त्याचं अभिनंदन केलं होतं असं समजत आहे. तसेच शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन निमंत्रण सुद्धा दिलं होतं.

Uddhav Thackeray l नवीन राजकीय समिकरणं जुळून येणार का? :

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसमोर असलेल्या आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत केंद्रीय गृहमंत्री आणि अनेक भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडला आहे. मात्र या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे गैरहजर होते.

मात्र प्रत्यक्षात त्यांना सोहळ्याला उपस्थित राहिले नसले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे यामधून आता पुन्हा काही नवीन राजकीय समिकरणं जुळून येतात का? याबद्दलच्या राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

News Title – Uddhav Thackeray Call Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरामुळे केंद्राकडे केली मोठी मागणी!

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 14 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ!, मित्रांसोबत बाहेर गेला आणि…

दोन्ही पवारांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली? दादांनी सर्वकाही सांगितलं

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, ‘त्या’ निकषांबाबत महत्वाची माहिती समोर

“पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे…” नाना पटोले स्पष्टच बोलले

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now