मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला?, उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा

On: August 16, 2024 1:19 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आज (16 ऑगस्ट) उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या मविआच्या मेळाव्यात जोरदार भाषण केलं. तसंच, यावेळी त्यांनी मविआकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण (Uddhav Thackeray ) असणार, याबाबत एक मोठी घोषणा केली.

कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी, मी तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा उल्लेख करत असं आवाहन केलं.

“मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा,आम्ही पाठिंबा देऊ”

“भाजपसोबत असताना जो अनुभव मिळाला त्याची पुनरावृत्ती आम्हाला नको. तेव्हा आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही.”, असं उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) म्हणाले.

यावेळी ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केलं. “मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मुंबईतसुद्धा अनेक अडचणी आहेत. मोदी-शाह हे मुंबईकडे सोन्याचं अंडं देणारी कोबंडी म्हणून पाहात आहेत. या कोंबडीला आपल्याला कापू द्यायचे नाही.”, असं ठाकरे म्हणाले.

“..पण जागा वाटपात भांडण करू नये”

तसंच, जागावाटपवरून भांडण करू नका. त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि पवार साहेबाच्या हातात तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा. मी पुन्हा एकदा सांगतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नये, असं उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray ) यांनी बोलून दाखवलं.

News Title-  Uddhav Thackeray announced the face of CM post 

महत्वाच्या बातम्या-

महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सर्व दवाखाने राहणार बंद; इमर्जन्सी असल्यास काय?

“नवाब सैफ अली खान तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत?”; सोशल मीडियावर रंगल्या चर्चा

‘हा’ बडा नेता काँग्रेसच्या वाटेवर; भाजपला मोठा धक्का?

रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या जबरदस्त 5G Smartphones, किंमत तुमच्या बजेटमध्येच

राज्यात पाऊस कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली माहिती

Join WhatsApp Group

Join Now