Uddhav Thackeray | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. दोन्ही आघाडीकडून सध्या जागावाटप संदर्भात चर्चा सुरू आहे. अशात भाजप आणि अजित पवार गटाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षाला मोठा धक्का दिलाय. (Uddhav Thackeray)
अजित पवार गट आणि भाजपमधील दोन बडे नेते हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि भाजप नेते राजन तेली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अनेक वर्षांनी ते पुन्हा एकदा स्वगृही परतणार आहेत.
भाजप व अजितदादा गटाचे नेते शिवसेनेच्या मार्गावर?
आज (18 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता मातोश्रीवर या दोन नेत्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे राजन तेली यांना शिवसेनेकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची देखील राजकारणात चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. (Uddhav Thackeray)
यामुळे सोलापूरमध्ये अजित पवारांना मोठा फटका बसू शकतो. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात आता त्यांचेच गेल्या वेळचे सहकारी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती. काही मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की, दीपक साळुंखे हे आता अजितदादांची साथ सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करतील.
त्यामुळे या विधानसभेत सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या विरोधात दीपक साळुंखे अशी लढत दिसण्याची शक्यता वर्तवली जातेय.
सोलापूरत अजित पवारांना धक्का बसणार?
दुसरीकडे सांगोला हा पारंपारिक शेतकरी पक्षाचा बालेकिल्ला असून या जागेवर उद्धव ठाकरे यांनी हक्क सांगितल्याने शेतकरी कामगार पक्ष बंड करू शकतो, असंही बोललं जातंय. त्यातच दीपक साळुंखे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष काय भूमिका घेणार, याबाबत सर्वांचं लक्ष राहील. (Uddhav Thackeray)
News Title : Two Mahayuti leaders may join Uddhav Thackeray group
महत्वाच्या बातम्या –
आज शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ!
निवडणुकीआधी इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा!
रेल्वेचा मोठा निर्णय! फक्त ‘इतके’ दिवस आधी रेल्वेचं तिकीट बूक करता येणार
पाठदुखीचा त्रास होतोय? तर वेळीच सावध व्हा… अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान






