Ashish Kapoor Arrest | टीव्ही इंडस्ट्रीतील ओळखता चेहरा आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘ससुराल सिमर का’ यांसारख्या मालिकांमधून लोकप्रिय ठरलेला अभिनेता आशिष कपूर गंभीर गुन्ह्यात अडकलाय. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनंतर बुधवारी पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.
काय आहे प्रकरण? :
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेसोबत आशिषची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती. त्यानंतर त्याने तिला दिल्लीतल्या एका मित्राच्या घरी हाऊस पार्टीला बोलावलं. त्या पार्टीदरम्यान आशिष आणि महिला दोघं वॉशरुममध्ये गेले आणि तिथेच बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. (Ashish Kapoor Arrest)
पीडितेचं म्हणणं आहे की, आशिषने ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळलं आणि तिला गुन्ह्याबद्दल पोलिसांत तक्रार करू नये म्हणून व्हिडीओ लीक करण्याची धमकी दिली होती.
Ashish Kapoor Arrest | सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस :
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आशिष आणि महिला वॉशरुममध्ये जाताना दिसले आहेत. बराच वेळ दोघं बाहेर न आल्याने पाहुण्यांनी दरवाजा ठोठावल्याचंही पोलिसांनी सांगितलं. यामुळे तक्रारीतील आरोपांना बळकटी मिळत असून, तपास वेगाने सुरू आहे.
४० वर्षीय आशिष कपूरने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये ‘श्श्श… फिर कोई है’, ‘ससुराल सिमर का 2’, ‘सात फेरे.. सलोनी का सफर’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘मोलकी- रिश्तों की अग्निपरीक्षा’ ‘देखा एक ख्वाब’ या मालिकेत त्याने साकारलेली उदयची भूमिका त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून देणारी ठरली.
सध्याची स्थिती :
त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही तो चर्चेत राहिला आहे. सहअभिनेत्री प्रियल गोर, निर्माती पर्ल ग्रे आणि युरोपियन महिला इदा क्रोनी यांच्यासोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. एप्रिल २०२१ मध्ये त्याचा साखरपुडा झाला होता, मात्र नंतर त्यांचं नातं तुटलं. (Ashish Kapoor Case)
सध्या पोलिसांनी आशिष कपूरला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. संबंधित महिलेकडून मिळालेल्या जबाबांनुसार तपास पुढे नेला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.






