Tripti Dimri | बाॅलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो शेअर करत असते. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ॲनिमल या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटात तृप्तीने इंटिमेट सीन दिल्यामुळे एका रात्रीतूनच तृप्ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान, तृप्ती एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
जयपुर येथे एका कार्यक्रमात तृप्तीला (Tripti Dimri) बोलवण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात हजर राहण्यासाठी तृप्तीला उशीर झाला. मात्र तृप्तीने पैसे घेतले पण कार्यक्रमात वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे अनेकांनी तृप्तीवर संताप व्यक्त केला आहे. शिवाय तिच्यावर बहिष्कार टाका, असं देखील लोक म्हणत आहेत. एवढंच नाही तर तृप्तीवर कायदेशीर कारवाई करू, अशी देखील धमकी दिली आहे.
पुढे काय घडलं?
तृप्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने संताप व्यक्त केला आहे. यावेळी ती म्हणते की, ‘कोणीही हिचे सिनेमे पाहाणार नाही. आधी शब्द देतात आणि त्यानंतर येत नाहीत. वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. ही कोणती मोठी सेलिब्रिटी आहे? कोणाला हिचं नाव देखील माहिती नाही. आम्हाला पाहायचं होतं ही नक्की आहे तरी कोण? स्वतःला सेलिब्रिटी बोलावून घेण्याची तिची लायकी नाही.
This is so bad, ya! Just because #TriptiiDimri is a celeb that doesnt give anyone the right to do such things for a meagre 5 L.
Not only her, many actors will be scared to attend ficci flo’s events #VickyVidyaKaWohWalaVideo
— Bollywood Talkies (@bolly_talkies) October 1, 2024
मी 5 मिनिटांत कार्यक्रम स्थळी पोहोचते असं देखील ती म्हणाली होती. पूर्ण करार 5.5 लाख रुपयांचा झाला होता. तिने आज आमचा अपमान केला आहे, असं म्हणत लोकांनी तृप्ती विरोधात संताप व्यक्त केला..
News Title : tripti dimri video goes viral
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! एमएस धोनीचे चाहते हैराण
‘या’ आजाराने वाढवलंय नागरिकांचं टेन्शन! अशी घ्या स्वतःची काळजी
बिग बॉसकडून सूरज चव्हाणवर अन्याय; आता थेट…






