पैसे झाले डबल, ‘या’ शेअरने दिली छप्परफाड कमाई

On: January 17, 2025 3:56 PM
Share Market
---Advertisement---

Shares l ट्रायडेंट टेकलॅब्सच्या (Trident Techlabs) शेअर्समध्ये (Shares) गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. वर्षभरापूर्वी ३५ रुपयांना असणारे हे शेअर्स आता १४५० रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी, हा शेअर १४५० रुपयांवर व्यवहार करत होता. या स्मॉल कॅप (Small Cap) कंपनीच्या शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांना ३८०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

या शेअरची वर्षभरातील कामगिरी पाहता, ५२ आठवड्यांचा उच्चांक १६७० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १५७.१० रुपये आहे. २१ डिसेंबर २०२३ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झालेला ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ (IPO) २६ डिसेंबर २०२३ पर्यंत खुला होता. आयपीओमध्ये शेअरची किंमत ३५ रुपये होती. २९ डिसेंबर २०२३ रोजी हा शेअर ९८.१५ रुपयांवर लिस्ट (List) झाला आणि अवघ्या काही दिवसात, म्हणजे १७ जानेवारी २०२४ रोजी १४५० रुपयांवर पोहोचला.

गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ट्रायडंट टेकलॅब्सचा आयपीओ एकूण ७६३.३ पट सबस्क्राइब (Subscribe) झाला होता. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा (Retail Investors) कोटा तब्बल १०५९.४३ पट सबस्क्राइब झाला होता.

Shares l गुंतवणूकदारांना किती फायदा?

नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (NII) कॅटेगरीमध्ये ८५४.३७ पट आणि क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स (QIB) कॅटेगरीमध्ये ११७.९१ पट सबस्क्रिप्शन (Subscription) मिळाले होते. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त एका लॉटसाठी (Lot) बोली लावता आली. एका लॉटमध्ये ४००० शेअर्स होते. म्हणजेच, एका लॉटसाठी १,४०,००० रुपये गुंतवावे लागले.

News Title: Trident Techlabs Share: A year of massive growth

महत्वाच्या बातम्या-

सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ सोपा घरगुती उपाय करा

अभिनेता सैफ अली खानच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ, आता ‘ते’ प्रकरण देखील भोवणार?

हवामानात मोठा बदल होणार?; पंजाबराव डख यांच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत ऐकून विश्वास बसणार नाही

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now