सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अहमदाबाद विमान दुर्घटनेत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू

On: June 12, 2025 6:46 PM
Ahmedabad Plane Crash (1)
---Advertisement---

Air India Crash | गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज एक मोठी आणि हृदयद्रावक विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे AI-171 हे प्रवासी विमान कोसळले. या विमानात अनेक भारतीय, ब्रिटिश आणि इतर देशांचे नागरिक होते. या भीषण अपघातात सात मराठी लोकही प्रवास करत होते, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तटकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुनील तटकरेंच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

एअर इंडियाचे (Air India Crash) AI171 विमान अहमदाबादहून लंडनला जात होते. हे विमान डॉक्टरांच्या वसतिगृहाजवळ कोसळले असून, यात २४२ प्रवासी होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमान कोसळल्याने ही मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विमानात असलेल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, ज्यामुळे ही घटना अत्यंत भीषण ठरली आहे.

अपर्णा महाडिकांचा मृत्यू

विमान प्रवासात महाराष्ट्रातून सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक या क्रू मेंबर म्हणून होत्या. त्या सुनील तटकरे यांच्या मोठ्या बहिणीच्या सूनबाई आहेत, म्हणजेच त्यांच्या सख्ख्या भाच्याची पत्नी. अपर्णा महाडिक ‘केबिन क्रू’ म्हणून कार्यरत होत्या. आज सकाळीच त्या अहमदाबादला गेल्या होत्या आणि दुपारच्या या दुर्दैवी विमानात त्या कार्यरत होत्या. अपर्णा यांचे पती देखील एअर इंडियामध्येच आहेत. अपर्णा आणि त्यांचे पती मुंबईतील गोरेगाव येथे राहत होते. त्यांच्या निधनाने महाडिक आणि तटकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते, आणि यातील सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि कुटुंबीयांच्या दुःखाची चिंता व्यक्त केली जात आहे.

News Title- Tragedy Strikes Tatkare Family: Daughter-in-Law Dies in Plane Crash

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now