राज्य सरकारचा मोठा निर्णय! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासून टोलमाफी

Pandharpur Wari | महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे रवाना झाल्या आहेत. पावसाच्या सरीत, वादळ वारा, उन्हात मुखी हरीनाम जपत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत. यासोबतच खासगी वाहनांचीही मोठी संख्या पंढरपूरकडे निघाली ये-जा करत आहे.

या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून 21 जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे.

आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी

गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी केली होती.आता यावर्षी देखील राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ होणार आहे.

आजपासूनच हा निर्णय लागू होणार आहे. 3 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. यासोबतच गरज भासल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही (Pandharpur Wari) राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत.

21 जुलैपर्यंत मिळणार टोलमाफी

दरम्यान, वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत. याचबरोबर एसटी महामंडळाच्या बसेसनाही टोलमाफी देण्यात आली आहे. तशा (Pandharpur Wari) सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

News Title – Toll waiver for vehicles going to Pandharpur Wari

महत्त्वाच्या बातम्या-

“लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रूपयांमध्ये संसार होणार आहे का?”

फळभाज्यांचे दर कडाडले; भाव गेले थेट शंभरी पार

दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; बजेटमध्ये PF संदर्भात होणार मोठा निर्णय?

“मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या”; मराठा संघटनांची मागणी