आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय!

On: October 14, 2024 12:08 PM
Eknath Shinde
---Advertisement---

Mumbai l आगामी विधानसभा निवडणूक जवळ येताच राज्य मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका होत आहेत. तसेच या बैठकांमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले जात असतात. अशातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुंबई येथील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्री बारा वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

राज ठाकरेंनी टोलमाफीवर दिली पहिली प्रतिक्रिया :

राज्य सरकारने मुंबई येथील पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफ केला आहे. या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टोल माफीसाठी गेल्या कित्येक वर्षांपासून आमचा लढा सुरु होता. मात्र आता त्याला यश मिळालं आहे. तसेच राज्य सरकारला उशिरा का होईना सुबुद्धी मिळाली आहे. मात्र आता हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम लागू व्हावा असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

याशिवाय राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची देखील दाट शक्यता आहे. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील टोल माफीचा निर्णय घेतल्याने नागरिकांना एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.

Mumbai l कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी असणार? :

आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
वाशी टोलनाका
मॉडेला टोलनाका
ऐरोली टोलनाका

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहे. मत या घोषणांचा पाऊस फक्त निवडणुकीपुरताच नसावा अशा प्रतिक्रिया देखील नागरिकांमधून येत आहेत.

News Title – toll exemption for light motor vehicles in mumbai

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात ‘या’ दिवशी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता?

शाहरुख खानच्या मुलावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप; म्हणाली, “तो मला प्रायव्हेट व्हिडिओ..”

राष्ट्रवादीचा अजून एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?, धक्कादायक माहिती समोर

बाबा सिद्दिकी हत्येनंतर भाजप नेत्याचा सलमान खानला मोठा सल्ला; थेट म्हणाले..

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन?, आणखी एका आरोपीला अटक

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now