राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

On: October 8, 2024 1:10 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update l राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. अशातच सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास देखील सुरू आहे. त्यामुळे राज्यात पावसाचं वेगळं रुप पाहायला मिळत आहे. अशातच आता हवामान विभागाने एक महत्वाची बातमी दिली आहे. येत्या 24 तासांमध्ये राज्यातील पुणे, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा परिणाम होणार आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी :

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असल्यामुळे विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. कारण परतीच्या पावसाच्या धर्तीवर हवामान विभागाने हा इशारा दिला आहे.

राज्यात सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि सांगली या भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपात पाऊस हजेरी लावणार असल्याचं हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच या दरम्यान या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे देखील वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Weather Update l राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा :

सध्या ऑक्टोबर महिना सुरु असल्यामुळे ऑक्टोबर हिटचा तडाखा देखील जास्त प्रमाणात वाढला आहे. राज्यातील विदर्भापासून ते मुंबईपर्यंत उष्णतेचा दाह दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून विदर्भात तापमान 35 अंशांच्या वर गेलेलं पाहायला मिळत आहे.

याशिवाय नैऋत्य मान्सून वाऱ्यांनी देखील महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता नंदुरबारपर्यंत मान्सूननं माघारच घेतली आहे. मात्र असे असताना देखील अद्यापही काही भागांवर कमी दाबाच्या क्षेत्राचे परिणाम मोठ्या प्रमाणात दिसत असून त्या भागात पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

News Title – Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोकण हार्टेड बॉय’ नेमका कोण?’ अंकिता वालावलकरने सांगितला लग्नाचा प्लॅन

अजित पवारांना धक्का, कट्टर समर्थक लढवणार अपक्ष निवडणूक?

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता मिळाला नाही? मग येथे करा थेट तक्रार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!

गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now