Weather Update l गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे, अशातच आता हवामान खात्याने राज्यातील काही भागांना अलर्ट देखील जारी केला आहे. कारण अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याती सर्वच भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच पुणे शहरासाठी देखील ठरत जारी केला आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी :
राज्यात पुढील चार दिवसांमध्ये म्हणजेच आजपासून ते मंगळवार पर्यंत मान्सून जोरदार सक्रिय होणार आहे. तसेच राज्यातील सर्वच जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा देखील इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मुंबई, पुणे, पालघरसह इतर 13 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जरी केला आहे. तर तब्बल 28 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे राज्यात मान्सूनचे वारे प्रचंड वेगाने सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आजपासून ते मंगळवारपर्यंत (27 ऑगस्ट) या कालावधीत राज्यात जोरदार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Weather Update l हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा सल्ला :
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच शनिवार ते सोमवार हे तीन दिवस पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर मंगळवारी यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क रहावं.
वाढत्या पावसाच्या घटनेमुळे आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, त्याचबरोबर घराबाहेर पडताना छत्री व रेनकोट घेऊनच बाहेर पडावे. याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे कोणीही झाडाखाली थांबू नये असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
News Title – Today Weather Update
महत्त्वाच्या बातम्या-
सोनं, चांदी झाली स्वस्त! जाणून घ्या आजचे दर
सतर्क! पुढील काही तासांत धो-धो बरसणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
कोलकात्यात पुन्हा धक्कादायक घटना; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारच्या काचा फोडल्या अन् ..
महाराष्ट्रावर शोककळा! नेपाळ बस दुर्घटनेत जळगावच्या 27 भाविकांचा मृत्यू
मोठी बातमी!’गब्बर’चा क्रिकेटला अलविदा; शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर






