Weather Update | पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून हवामान विभागाने २४ तासांसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी दिला आहे. या भागात विजांसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या ५ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा? :
पुण्यात सोमवारी २२ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर कमी राहिला असला तरी कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मात्र, आज पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह विजा व गडगडाटीच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
तसेच, सातारा जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी १ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज २३ सप्टेंबर रोजी कमाल तापमान २९ अंश राहील, तर पुढील २४ तासात ३०-४० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्याचसह साताऱ्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Weather Update | विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता :
कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात कालच्या २४ तासात हवामान शांत राहील. आज कमाल तापमान २९ अंश राहण्याचा अंदाज असून अंशतः ढगाळ वातावरण, गडगडाटीच्या सरी आणि विजांसोबत जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने इथेही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात मागील २४ तासांत १५ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी तापमान ३१ अंश सेल्सिअस राहीले. तर पुढील २४ तासांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे व नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.
सांगली (Sangli) जिल्ह्यात मागील २४ तासांत २ मिमी पाऊस झाला. तर जत परिसरात सगळ्यात जोरदार पाऊस नोंदविण्यात आला आहे. आज तिथे आकाश ढगाळ राहून तापमान २७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन सतर्कता बाळगावी :
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक भागात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. तसेच विजांच्या कडकडाटासोबत जोरदार पावसाच्या सरी, वेगाने वारे आणि जोरदार पावसाचा धोका असल्याने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
दरम्यान, नदीकाठच्या भागातील नागरिकांनी पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन सतर्कता बाळगावी. तसेच, शहरी भागात वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
News title : Today Maharashtra Weather Update






