Maharashtra l आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यातील वेगवेगळे राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार कामाला लागले आहेत. कारण काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामळे राजकीय नेते देखील पक्षाची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. अशातच आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय :
– वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार येणार आहे.
– सावनेर, राजापूर, अंबरनाथ, कणकवली, जिहे कठापूर आणि लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
– महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे.
– कायमस्वरुपी आणि विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय होणार.
– राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता देण्यात आली आहे.
– याशिवाय राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहेत.
– जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ देण्यात आली आहे.
– सिडको महामंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिल्या असलेल्या भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राज्यात राबवणार आहेत.
Maharashtra l मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरीक्त निधी उपल्बध :
– पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला देण्यात येणार आहे.
– बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे.
– महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात देखील सुधारणा करण्यात येणार आहे.
– कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला देण्यात येणार आहे.
– नागपूर येथील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प होणार.
– पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
– भेंडाळे वस्ती येथील प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित होणार आहे.
– रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार आहेत.
– मराठवाड्यातील शाळांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी देण्यात येणार आहे.
– राज्यातील शाळांना 20 टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा देण्यात येणार आहे.
News Title : Today maharashtra cabinet meeting decisions
महत्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?
रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार?, राज्य सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव
रतन टाटांच्या ‘या’ कारने घातला होता बाजारात धुमाकूळ; किंमत फक्त…
“रतन टाटा यांना भारतरत्न द्या”; कुणी केली मागणी?
रतन टाटांचं बॉलिवूडशी खास नातं; मात्र झाले ‘इतक्या’ करोडोंचे नुकसान






