आज गोपाष्टमी, श्रीकृष्ण कोणत्या राशींना देणार सुख-समृद्धी?; वाचा राशीभविष्य

On: November 9, 2024 7:29 AM
Today Horoscope 9 November
---Advertisement---

Today Horoscope | दैनिक राशिफळ (Today Horoscope ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते, ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे तपशीलवार वर्णन केले जाते.

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. त्यानुसार, आजचा 9 नोव्हेंबरचा दिवस कसा असणार याचे राशीभविष्य खाली दिले आहे.

आज गोपाष्टमी व्रत पाळण्यात येणार

आज शनिवारी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रात्री 10 वाजून 46 मिनिटांपर्यंत राहील. शनिवारी पहाटे 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत वृद्धी योग राहील.तर आज राहू काळ 9 वाजता सुरु होईल ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय आज गोपाष्टमी व्रत पाळण्यात येणार आहे. कार्तिक मासातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला गोपाष्टमी मोहोत्सव साजरा केला जातो.

धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत धारण केला होता. तेव्हापासून कार्तिक शुक्ल अष्टमीला गोपाष्टमी उत्सव साजरा केला जातो. आजच्या या दिवशी श्रीकृष्ण कुणाच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणणार ते पाहुयात. (Today Horoscope )

आजचे राशीभविष्य-

कर्क:- या राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल. आज तुम्हाला व्यवसायात डबल नफा होण्याची संभावना आहे. एकंदरीत आजचा दिवस आनंदी जाईल. (Today Horoscope )

सिंह:- आरोग्याबाबतीत असणाऱ्या तक्रारी दूर होतील. लॉन्ग ट्रीपला जाण्याच्या प्लॅन तुम्ही यशस्वी कराल. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. यामुळे मन प्रसन्न राहील. आवडते विवाहस्थळ चालून येईल. मुलींना नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.

कन्या:- आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. मित्रांसोबत फिरायला जाल. कुटुंबासोबत देखील आनंदी क्षण व्यतीत कराल. आज श्रीकृष्ण कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. (Today Horoscope )

तूळ:- भगवान श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि अडचणी दूर करतील. तुमचे सुखाचे दिवस येतील. घरात शुभ कार्य घडेल. कुटुंबासोबत असलेले काही मतभेद दूर होतील. जवळचा प्रवास कराल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळू शकते.

News Title : Today Horoscope 9 November

महत्वाच्या बातम्या –

19 व्या वर्षी पाचव्या मजल्यावरुन मारली उडी?, ‘या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

दीपिकाचा लेकीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

राज ठाकरे एकदा मुख्यमंत्री व्हाच! झळकले बॅनर

महायुतीला 80 टक्के मते मिळवून देण्यासाठी कामाला लागा- संभाजी पाटील निलंगेकर

एका झटक्यात झालेल्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत; जाणून घ्या नेमका काय?

Join WhatsApp Group

Join Now