आज नवरात्रीचा पाचवा दिवस, देवी स्कंदमाता ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

On: October 7, 2024 7:52 AM
Today Horoscope 7 October 2024
---Advertisement---

Today Horoscope | आज 7 ऑक्टोबररोजी अश्विन शुक्ल पक्षातील उदया तिथी चतुर्थी आणि सोमवार आहे. चतुर्थी तिथी सोमवारी सकाळी 9:48 पर्यंत राहील, त्यानंतर पंचमी तिथी सुरु होईल. त्याशिवाय आज सोमवारी नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जाते. याचबरोबर आज ललिता पंचमीचे व्रत आहे, यानिमित्ताने माता ललिताची पूजा केली जाते, तसेच आज कुमारीकांचेही पूजन केले जाते. (Today Horoscope)

आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी संपूर्ण दिवस आयुष्मान योग असणार आहे, जो मंगळवारी सकाळी 6 वाजून 51 मिनिटांपर्यंत असेल. आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा जाईल, माँ दुर्गेच्या आशीर्वादाने कोणत्या राशीचे जीवन सुखाने भरून निघेल, ते पाहुयात.

आजचे राशी भविष्य

मेष :  जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये.

वृषभ : आज घरात धार्मिक कार्य घडेल. पूजा-पाठ मध्ये मन रमेल. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी. (Today Horoscope)

मिथुन : आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

कर्क : तुम्हाला आज शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. आजचा दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका. (Today Horoscope)

सिंह : घरात सुख-समृद्धी येईल. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल.

कन्या : तुमच्या कष्टाला आज यश येईल.आज जवळचा प्रवास योग आहे. नवरात्रीत तुमच्या जीवनातील सर्व संकटे देवी दूर करेल. तुम्हाला धनलाभ देखील होण्याची दाट संभावना आहे. (Today Horoscope)

तूळ : खर्च करताना आवर घाला. अधिक पैसे खर्च होऊ शकतात. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

वृश्चिक : तुमचे आज वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मन शांत ठेवायचा प्रयत्न करा. आपले विचार लोकांसमोर मांडाल. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील. आजचा दिवस तणाव मध्ये जाऊ शकतो.

धनू : आज कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. आज संपूर्ण दिवस प्रसन्न राहाल. तुमच्यासाठी आज आवडते विवाहस्थळ येऊ शकते. यामुळे मन आनंदी राहील.

मकर : आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ : व्यवसाय करणाऱ्यांचे अच्छे दिन येतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीसाठी कॉल येईल. आज प्रवास योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. (Today Horoscope)

मीन : नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. यामुळे प्रसन्न राहाल.

News Title : Today Horoscope 7 October 2024 

महत्वाच्या बातम्या –

निक्की तांबोळीच्या आयुष्याबद्दल आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!

मोदींचं मंदिर बांधणाऱ्या नेत्याचा भाजपला रामराम, गंभीर आरोपांनी एकच खळबळ

‘मला त्याने खोलीत बोलवलं आणि ग्रुप सेक्स…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ

काँग्रेसच्या ‘या’ खासदाराच्या मुलाला अटक; नेमकं काय घडलं?

राज्यातील ‘या’ कुटुंबांना मिळणार 7000 रुपये; जाणून घ्या नेमकं कसं?

Join WhatsApp Group

Join Now