Today Horoscope | आज 3 ऑक्टोबररोजी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी 2 वाजून 59 मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असणार आहे.तसेच, आजपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एका शुभ मुहूर्तावर घटस्थापना केली जाते. घटस्थापनेला घरोघरी घट बसवला जातो. (Today Horoscope)
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. नऊ दिवस गरबा सुद्धा खेळला जातो. आजचा दिवस यामुळे अत्यंत शुभ असणार आहे. आजच्या दिवशी देवी शैलपुत्री कोणत्या राशीवर आपली कृपादृष्टी ठेवणार, ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य
सिंह रास : आज तुमचे बिघडलेले संबंध पुन्हा सुधारतील. देवीच्या कृपेने तुमचा व्यवसाय वाढीस लागेल. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची दाट संभावना आहे. आज दिवसभर मन प्रसन्न राहील. महिला वर्गाला आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुमच्या मनातील इच्छा देवी पूर्ण करेल. पूजा-पाठमध्ये मग्न व्हाल. (Today Horoscope)
कन्या रास : आपल्या मर्जीचे आपणच मालक असाल. मनाजोगी खरेदी करता येईल. दिवस शुभ ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या जेवणचा आस्वाद घ्याल. तुमची नोकरीची चिंता मिटेल. तुम्हाला आज नोकरीसाठी कॉल येईल, यामुळे आनंदी असाल. जोडीदारासोबत धार्मिक ठिकाणी दर्शनाला जाल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी देखील शुभ असेल.तुम्हाला शिक्षक योग्य साथ देतील. तुमच्या मनातील शंका दूर होतील.
तूळ रास : तुमचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. सर्व जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल. तुम्ही पडलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्यातील नेतृत्वगुण सर्वांनाच दिसून येईल. याचा फायदा तुम्हाला प्रमोशनमध्ये होईल. आजचा दिवस थोडा थकवणारा पण समाधानी जाईल. आज जवळचा प्रवास योग देखील आहे. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 3 October
महत्वाच्या बातम्या –
तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले
तीन कार लाँच! दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा भन्नाट फीचर्ससह ‘या’ कार
चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का! एमएस धोनीचे चाहते हैराण
‘या’ आजाराने वाढवलंय नागरिकांचं टेन्शन! अशी घ्या स्वतःची काळजी






