आज शनीदेव ‘या’ राशींच्या जीवनात धन-सुखाचा पाऊस पाडणार!

On: September 28, 2024 9:18 AM
Today Horoscope 28 September
---Advertisement---

Today Horoscope | आज 28 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांपर्यंत चालेल. त्याचप्रमाणे आज आश्लेषा नक्षत्रात सिद्ध योग जुळून आला आहे. आश्लेषा नक्षत्र दुपारी 3 वाजून 38 मिनिटांपर्यंत जागृत असेल तर रात्री 11 वाजून 51 मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. याचबरोबर आज इंदिरा एकादशीचे व्रत केले जाणार आहे. इंदिरा एकादशीच्या दिवशी शालिग्राम देवताची पूजा करण्याची पद्धत आहे. तसेच, आज शनिवारी शनीदेवाची देखील पूजा केली जाते. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

मेष : आज तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार. तुम्हाला सकारात्मक विचारांचा खूप फायदा होईल. (Today Horoscope)

वृषभ : आज कुटुंबात वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा.अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे.

मिथुन : आज निर्णय तुमच्या बाजूचा असेल. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील, त्या संधीचा फायदा घ्या. तुम्हाला सर्व कामात आज यश मिळेल.

कर्क : आज तुमच्यावर शनीदेवाची कृपा राहील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज वाहन खरेदीचा योग आहे. तुम्ही आज दान-धर्म कराल.

सिंह : आज तुम्हाला जुने मित्र भेटतील. जुन्या आठवणीत रमाल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. आज शाळेतील विद्यार्थांचे प्रश्न सुटतील. आजचा दिवस आनंदी जाईल. (Today Horoscope)

कन्या : व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. प्रेयसीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

तूळ : आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. आजचा दिवस थकवणारा असेल. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक : आज तुमच्या आरोग्याच्या समस्या दुर होतील. शनी देव तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धीचा पाऊस पाडेल. आज तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. घरात धार्मिक कार्य कराल. (Today Horoscope)

धनू : जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुम्हाला प्रमोशन मिळेल.

मकर : लहान आजारांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ : बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन : आज व्यावसायिक मंडळीला मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी आजचा दिवस आनंदी आणि आरामदायी जाईल. घरातील वाद आज मिटतील. त्यामुळे मन प्रसन्न राहील. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 28 September

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणे अडचणीत

भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!

PF चे पैसे काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा!

निक्कीच्या आईने अरबाजबद्दलची ‘ती’ गोष्ट सांगताच निक्कीला बसला मोठा धक्का!

पुण्यात बड्या बापांच्या मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला सामूहिक अत्याचार

Join WhatsApp Group

Join Now