Today Horoscope 27 December 2024 | ग्रहांचा राजा सूर्य हा नवग्रहांतील अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सूर्य हा आत्मा, मान- सन्मान, पद-प्रतिष्ठेचा कारक देखील मानला जातो. अशा परिस्थितीत सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर होत असतो. मात्र आता लवकरच सूर्य आणि शुक्र ग्रहाची वृषभ राशीत युती तयार होणार आहे. अशातच आज काही राशींसाठी खूपच चांगला दिवस आहे.
Today Horoscope 27 December 2024 | आजचे राशिभविष्य :
मेष :- आवडी-निवडी साठी खर्च कराल. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. कामावर लक्ष केंद्रित करावे. आज आर्थिक धनलाभ संभवतो.
वृषभ :- आपले मानसिक आरोग्य जपावे. अति विचार करू नयेत. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. व्यापारात काही नवीन सुविधा कराल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो.
कन्या :- आवश्यक तिथे आक्रमक पवित्रा घ्यावा. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध रहा. जोडीदाराचे सहकार्य घ्याल. स्वत:साठी थोडा वेळ काढावा. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील.
धनू :- आहाराचे पथ्य न चुकता पाळा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. परोपकाराचे महत्त्व लक्षात घ्याल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. कष्टाचे फळ आज मिळणार.
मकर:- नवीन कामे हाती घेण्याचा विचार कराल. भावंडांशी मतभेद संभावतात. सासरच्या मंडळींकडून आर्थिक मदत मिळेल. प्रलंबित कामे अडकून पडू देऊ नका. काही गोष्टीत समाधान मानावे लागेल.
मीन:- अतिघाई करू नये. जोडीदाराच्या मताचा अवश्य विचार करावा. कामात गोंधळ उडवून घेऊ नका. घरातील वातावरण खेळकर राहील. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात. मात्र आज धनलाभ होणार आहे.
News Title : Today Horoscope 27 December 2024
महत्वाच्या बातम्या –
बीडमध्ये पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, अखेर त्याला उचललं!
पुणेकरांनो….,थर्टीफर्स्टला घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!
एअरटेल ग्राहकांना मोठा फटका! फोन, इंटरनेट सेवा ठप्प
सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी केली फाशीची मागणी!
सरपंच संतोष देशमुख प्रकरणी पंकजा मुंडेंचा सर्वात मोठा खुलासा!






