आज गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार?, वाचा राशी भविष्य

On: September 26, 2024 7:38 AM
Today Horoscope 26 September
---Advertisement---

Today Horoscope | आज 26 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. नवमी तिथी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांपर्यंत राहील. आज परिघ योग जुळून येईल. हा योग रात्री 11 वाजून 41 मिनिटांपर्यंत राहील. तसेच, आज गुरुवारी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा फायदा काही राशीला होणार आहे. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य

मेष रास : आपल्या कामावर लक्ष द्या, जास्त चिडचिड करू नका. आज तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

वृषभ रास : आज हातात घेतलेले सगळे काम पूर्ण कराल. कामे मनाप्रमाणे मार्गी लावाल. मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रेम संबंधात गैरसमज टाळा. कामाच्या ठिकाणी सुसंवाद होईल. (Today Horoscope )

मिथुन रास : इतरांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्याल. बुद्धीने विचार करून निर्णय घ्या. भावनिक होऊ नका.

कर्क रास : आज प्रवास योग आहे. आपल्या सामानाची काळजी घ्या. जुने ठरवलेली कामे पूर्ण कराल. आजचा दिवस धावपळीचा असेल, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.

सिंह रास : आज तुम्हाला मानसिक ताण-तणाव जाणवू शकतो. त्यामुळे होईल तितके शांत राहा. तूर्तास धाडसी निर्णय नकोत. कुटुंबासाठी काही खरेदी कराल. नवीन विचार लगेच अंमलात आणावा. (Today Horoscope )

कन्या रास : तडजोडीला पर्याय नाही. कामात एकाग्रता ठेवा. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. मित्रांना मदत कराल.

तूळ रास : आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमचे कोणतेही कार्य सफल होईल. यामुळे दिवसभर आनंदी राहाल. बुद्धिकौशल्यावर लोक खुश होतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. लहान भावंडांना मदत कराल.

वृश्चिक रास : मुलांबरोबर वेळ घालवाल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते. दिवसाची सुरवात मेहनतीत जाईल. फिरायला जाण्याची इच्छा प्रबळ होईल. आज जवळच्या व्यक्तीसोबत गप्पा-गोष्टी रंगतील. (Today Horoscope )

धनू रास : आज तुम्हाला नवीन व्यक्ती भेटतील. तरुण वर्गाकडून काही नवीन शिकायला मिळेल. मनोकामना पूर्ण होतील.

मकर रास : आज कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. आज तुम्हाला नोकरीच्या संधी चालून येतील. आज तुम्ही आवडती वस्तु खरेदी कराल.

कुंभ रास : क्षुल्लक गैरसमजातून वाद वाढू शकतात. चर्चेतून नवीन कल्पना सुचतील. आज दिवस संमिश्र असेल. आज तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल. दिवसाच्या शेवटी आनंदाची वार्ता कानी पडेल. आज तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.

मीन रास : घाई-घाईने कामे करू नयेत. नियोजनावर अधिक भर द्यावा. सासुरवाडीचे लोक मदत करतील. अनावश्यक खर्चाला आळा घालावा. (Today Horoscope )

News Title : Today Horoscope 26 September

महत्वाच्या बातम्या –

तर पाडापाडी झाल्यास…; जरांगे पाटलांनी सरकारला दिला थेट इशारा

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या!; ‘या’ खुलाशाने सगळीकडे खळबळ

पोलिसांनी अक्षयचा एन्काऊंटर केलं असेल तर डबल अभिनंदन; शर्मिला ठाकरे असं का म्हणाल्या?

अरबाज पटेल पुन्हा बिग बॉसमध्ये झळकणार?

अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मोठा प्रश्न उपस्थित

Join WhatsApp Group

Join Now