आज ‘या’ राशींना मेहनतीचे फळ मिळणार? धनलाभ होणार

On: December 26, 2024 9:22 AM
Today Horoscope 26 December 2024
---Advertisement---

Today Horoscope 26 December 2024 | आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी ही रात्री 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत राहणार आहे. तसेच आज सुकर्म योग देखील आहे. रात्री 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत सुकर्म योग राहणार आहे. तर स्वाती नक्षत्र संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर राहू काळ दुपारी 1 वाजता सुरु होईल ते दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे.

Today Horoscope 26 December 2024 | आजचे राशिभविष्य :

मेष:- व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल. अचानक धनलाभ संभवतो. शुभ रंग काळा, शुभ अंक 4

वृषभ:- तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील. आर्थिक गोष्टी मार्गी लागतील. शुभ रंग विटकरी, शुभ अंक 9

मिथुन:- मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल. आज मेहनतीचे पैसे प्राप्त होतील. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 1

कर्क:- आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. लक्ष्मीच्या कृपने धनलाभ होणार. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल. शुभ रंग पिवळा, शुभ अंक 3

सिंह :- मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये. प्रयत्नांचे फळ नक्की मिळेल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक 2

कन्या :- कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक सुख मिळेल. पैशाची कमी भासणार नाही. शुभ रंग पांढरा, शुभ अंक 1

मकर :- कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. शुभ रंग लाल, शुभ अंक 7

कुंभ:- समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा. शुभ रंग नारंगी, शुभ अंक 9

News Title : Today Horoscope 26 December 2024

महत्वाच्या बातम्या –

हे कसलं प्रेम!, प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तरूणाचं भयंकर कृत्य

विनोद कांबळीच्या मदतीला शिंदेसेना, वानरसेनेनेही उभे केले २० लाख रुपये!

मुख्यमंत्र्यांना हवयं ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्री पद! कोणता आहे तो जिल्हा?

सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचललं मोठं पाऊल

बीडचा वणवा राज्यभर पेटणार?, सरपंच हत्येप्रकरणी विरोधकांचा एल्गार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now