Today Horoscope | आज 22 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत राहील. आज परीघ योग सकाळी 8 वाजून 46 मिनिटांपर्यंत जुळून येईल, त्यानंतर शिवयोग सुरु होईल. तसेच, आज राहू काळ दुपारी 3 वाजता सुरु होईल ते संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल. आज मंगळवारी, मेष ते मीनच्या राशीत काय घडामोड होणार ते पाहुयात. (Today Horoscope )
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज तुमचे टोकाचे वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा.जोडीदाराशी उगाच वाद घालू नका. भागीदारीत सबुरीने वागावे.
वृषभ रास : आज दिवस तुमच्या मनासारखा जाईल. चारचौघात कौतुक होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. (Today Horoscope )
मिथुन रास : आज तुम्हाला तुमच्या पार्टनरची उत्तम साथ मिळेल. क्षुल्लक कारणावरून चिडू नका. आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ होईल.
कर्क रास : कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.सर्वांना आपलेसे करून घ्याल. आज जवळच्या व्यक्तीचीही भेट होईल. गप्पा-गोष्टीमध्ये रमून जाल. आज काम करताना कंटाळा येईल. शरीरात स्फूर्ती राहणार नाही.
सिंह रास : तुमच्याबाबत गैरसमज पसरू शकतो. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. इतरांच्या बोलण्यात जास्त लक्ष घालू नका. तुमचे मन विचलित होऊ शकते. (Today Horoscope )
कन्या रास : अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. अपशब्द टाळण्याचा प्रयत्न करावा. हातात काही नवीन जोखमीची कामे येतील. ती योग्यपणे हाताळाल.
तूळ रास : डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. काही जुने प्रश्न सामोरे येतील. यामुळे तणाव जाणवू शकतो.
वृश्चिक रास : एकाच गोष्टीवर अडून राहू नका. कर्ज प्रकरणे वेळेवर हाताळा.आज तुमची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. राजकारणी धोरण महागात पडू शकते. स्वत:चेच खरे कराल.
धनू रास : प्रत्येक गोष्टीकडे आनंदी नजरेने पहाल.आवडीचे पदार्थ चाखाल. कामे मनाजोगी पार पडतील. झोपेची तक्रार जाणवेल.
मकर रास : तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडे बारीक लक्ष ठेवावे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. राजकारणी व्यक्तीला आज मोठी जबाबदारी मिळू शकते.
कुंभ रास : मित्रांच्या सहवासात रमाल. आवडती वस्तु खरेदी कराल. तुमचे उद्दिष्ट साध्य कराल. यामुळे मन आनंदी राहील. (Today Horoscope )
मीन रास : शारीरिक कष्ट अधिक संभवतात. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता. जास्त अपेक्षा बाळगू नका. अपेक्षा भंग होण्याची दाट संभावना आहे. जोडीदारासोबत देखील वाद होऊ शकतात.
News Title : Today Horoscope 22 October 2024
महत्वाच्या बातम्या –
‘मी निवडणूक लढवणारच’; भाजप नेत्याचा लेक ऐकायलाच तयार नाही
मोठी बातमी! राज ठाकरेंकडून दोन उमेदवारांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ दिवशी दाखल करणार उमेदवारी अर्ज!
शरद पवारांचा मोठा डाव; ‘हा’ बडा नेताही तुतारी हाती घेणार
अखेर सत्य उघड! अभिषेकच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री, ऐश्वर्याला देणार घटस्फोट?






