आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग, देवी लक्ष्मी कुणाच्या इच्छा पूर्ण करणार?

On: November 21, 2024 7:52 AM
Today Horoscope 21 November
---Advertisement---

Today Horoscope | आज 21 नोव्हेंबररोजी कार्तिक मासातील कृष्ण पक्षाची षष्ठी तिथी आहे. षष्ठी तिथी संध्याकाळी 5 वाजून 04 मिनिटांपर्यंत राहील. तसेच गुरुवारी राहू काळ दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल. याबरोबर आज चंद्र स्वतःच्या कर्क राशीत जाईल. त्याचबरोबर आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. (Today Horoscope)

यादिवशी देवी लक्ष्मीची पूजा व दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करतात, तर, आजच्या या शुभ दिनी कोणत्या राशीवर देवी लक्ष्मी प्रसन्न राहणार, ते पाहुयात.

आजचे राशी भविष्य

मिथुन:- आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मिळेल. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. व्यावसायिक गोष्टीत नवीन ओळखीचा उपयोग होईल. आजचा दिवस शुभवार्ताने सुरू होईल.

कर्क:- तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील. सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील. भावनेला आवर घालावी लागेल. घरगुती प्रश्न सुटतील. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होईल. (Today Horoscope)

तूळ:- आज तुमच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असेल. आज गुरुपुष्यामृत योगात तुमची सगळी कामे यशस्वी होतील. तुमच्यावर आज धनवर्षाव देखील होण्याची दाट संभावना आहे. तुमचे आज कामाच्या ठिकाणी कौतुक देखील केले जाईल.

वृश्चिक:- अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवा. जवळचा प्रवास योग आहे. पप्रेयसीसोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. (Today Horoscope)

धनू:- तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते. तरूणांकडून नवीन विचार जाणून घ्याल. वैवाहिक आयुष्यातील प्रश्न सुटतील. यामुळे आनंदी आणि प्रसन्न असाल. तुमच्यावर आज देवी लक्ष्मी प्रसन्न असेल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 21 November

महत्वाच्या बातम्या –

परळीत जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप

शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला

ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला किती मिळणार पोटगी?

अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर धक्कादायक आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Join WhatsApp Group

Join Now