मेष ते मीन आज शनिदेव कोणत्या राशींवर ठेवणार कृपादृष्टी?, वाचा राशीभविष्य

On: December 23, 2024 7:47 AM
Today Horoscope 21 December 2024
---Advertisement---

Today Horoscope 21 December 2024 | आज 21 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी आहे. षष्ठी तिथी दुपारी 12 वाजून 22 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आजचा संपूर्ण दिवस आणि रात्र पार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जागृत राहील.तसेच आजपासून उत्तरायणारंभ सुरु होणार आहे. म्हणजेच शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. तर आजचा दिवस कोणत्या राशींसाठी कसा जाईल ते पाहुयात. (Today Horoscope 21 December 2024)

आजचे राशीभविष्य-

मेष:- कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:- उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. होईल तितके मन शांत ठेवा.

मिथुन:- आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल.

कर्क:- नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.भौतिक सुखाचा आनंद घ्याल. आजचा दिवस प्रसन्न जाईल.

सिंह:- घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल.

कन्या:- शालेय स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. शनिदेव तुमच्यावर प्रसन्न राहतील. (Today Horoscope 21 December 2024)

तूळ:- अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. व्यवसायात लाभ होईल.

वृश्चिक:- आर्थिक लाभाचे संकेत आहेत. घेतलेले काम यशस्वीपणे पूर्ण कराल.

धनू:- आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आरोग्य जपा.

मकर:- आपला संयमी स्वभाव फायदा करून देईल. जवळचा प्रवास योग आहे. आज धनलाभ होऊ शकतो.

कुंभ:- कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. (Today Horoscope 21 December 2024)

मीन :- नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे कराल.

News Title : Today Horoscope 21 December 2024

महत्वाच्या बातम्या –

सरपंच संतोष देशमुख प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया!

‘नोकरी टिकवायची असेल तर मला…’; ऑफिसमधल्या महिलेसोबत नक्की काय घडलं?

विराट अनुष्काने घेतला सर्वात मोठा निर्णय, जवळच्या व्यक्तीकडून खुलासा!

छगन भुजबळ मुंबईला रवाना, मोठा निर्णय घेणार?

संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार?

Join WhatsApp Group

Join Now