Today Horoscope | आज 2 ऑक्टोबररोजी महिन्याचा दुसरा दिवस आहे. आज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या म्हणजे सर्वपित्री अमावस्या आहे. अमावस्या तिथी आज रात्री 12 वाजून 19 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज श्राद्ध, पिंडदान केले जाईल. याशिवाय आज सूर्यग्रहण देखील असणार आहे, पण हे ग्रहण भारतात दिसणार नाही.आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज जवळचा प्रवास योग घडेल. आज तुमच्या विचारात सकारात्मक बदल होतील. मनातील इच्छा आज पूर्ण होतील.
वृषभ रास : आज तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. दिवस चांगला जाईल, त्यामुळे समाधान वाटेल. तुम्ही व्यवसायसंबंधी नवीन करार कराल. याचा तुम्हाला फायदा होईल.
मिथुन रास : आज तुम्हाला जोडीदाराची योग्य साथ लाभेल. तुम्ही नवीन काहीतरी सुरू करत असाल तर तुम्हाला कुटुंबाची साथ मिळेल. तुमची आर्थिक भरभराट होईल. (Today Horoscope)
कर्क रास : नोकरीत उत्साही वातावरण राहील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. राहिलेली कामे पूर्ण कराल.
सिंह रास : आपल्याला आवडणार्या गोष्टीत अधिक लक्ष घालाल. आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.तुमच्या आदर भावाने सगळ्यांची मने जिंकाल. (Today Horoscope)
कन्या रास : तुमच्या कलेला व्यासपीठ मिळेल. तुम्हाला आज नवीन संधी मिळेल, त्या संधीचे सोने करा. दिलेली जबाबदारी पूर्ण कराल.
तूळ रास : आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे आज कौतुक होईल. यामुळे प्रसन्न राहाल.तुम्हाला आज जवळच्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल.
वृश्चिक रास : काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. जुनी उधारी वसूल होईल. मन प्रसन्न राहील. दिवसभरात काहीना काही लाभ मिळेल.
धनू रास : आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ होऊ शकतो. स्वत:वरील विश्वास कायम ठेवावा. व्यावहारिक फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते. (Today Horoscope)
मकर रास : वाहन खरेदीचा योग आहे. आज तुम्ही पैसे खर्च करताना मागे पुढे पाहणार नाही. आजचा दिवस उत्साही जाईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
कुंभ रास : तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. मानसिक शांती लाभेल.
मीन रास : तुम्हाला आज अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला नवीन कार्य सुरू करायचे असल्यास आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात मोठं यश मिळेल. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 2 October
महत्वाच्या बातम्या –
अजित पवारांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता तुतारी फुंकणार
“रोहित पवार शरद पवारांचा पुढील वारसा..”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल
लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली देवाला सुद्धा…
बिग बॉस ग्रँड फिनालेपूर्वी Mid-Week एलिमिनेशन; व्होटिंग लाइन्स ‘या’ दिवशी बंद होणार?






