आज गुरुवारी, देवी लक्ष्मी ‘या’ 3 राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

On: December 19, 2024 8:08 AM
Today Horoscope 19 December 2024 
---Advertisement---

Today Horoscope | आज 19 डिसेंबररोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी सकाळी 10 वाजून 03 मिनिटांपर्यंत चालेल. त्यानंतर पंचमी तिथी सुरू होईल. आज राहू काळ 1 वाजून 3 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार असणार आहे. आजच्या दिवशी लक्ष्मीचे व्रत करतात, या दिवशी घट मांडून, लक्ष्मीची पूजा करुन उपवास सुद्धा करतात. (Today Horoscope)

देवी लक्ष्मीची श्रद्धेने आणि मनोभावे पूजा केल्याने श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होते, त्यांच्यावर तिची कृपा असते.तर आज श्रीमहालक्ष्मी कोणत्या राशींच्या नशिबात सुख घेऊन येणार ते पाहुयात-

आजचे राशीभविष्य-

मेष रास (Aries Today Horoscope)

आज कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरेल. आज संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. तुमच्यावर आज धनवर्षाव होईल. देवी लक्ष्मी तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस घेऊन येईल.

वृषभ रास (Taurus )

कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. भावनांना अधिक महत्व द्याल. तुमचे प्रेमात बिघडलेले संबंध पुन्हा चांगले होतील. त्यामुळे आनंदी राहाल. भविष्याच्या दृष्टीने तुम्ही आज जोडीदाराबाबत मोठा निर्णय घ्याल. तुम्हाला आज उधारीचे पैसे परत मिळतील. कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला प्रमोशन मिळेल.

तुळ रास (Today Horoscope)

तुम्हाला नोकरीसाठी आज कॉल येईल. तुमचा नोकरीचा शोध आज पूर्ण होईल. पगारही चांगला मिळेल. आजचा दिवस स्मरणात राहण्यासारखा जाईल. प्रेमत असणाऱ्या व्यक्तींसाठी देखील आजचा दिवस स्पेशल असेल. तुम्हाला आज भेटवस्तू मिळेल. तुम्ही आज आनंदी असाल. मुलांच्या शैक्षणिक करिअर बाबत देखील तुम्हाला आज चांगले पर्याय मिळतील.

News Title : Today Horoscope 19 December 2024 

महत्वाच्या बातम्या –

राधिका आपटेचे प्रेग्नंसीचे नको तसले फोटो व्हायरल!

निधनानंतर जसा मातंग होता, तसा…; विजय शिवतारेंची तिखट भाषेत नाराजी व्यक्त

आरक्षण मिळालं की सोन्याचे कौल आपल्या घरावर बसत नाही? भुजबळ स्पष्टच बोलले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?

“अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला”, भुजबळ समर्थकांची जोरदार बॅनरबाजी

Join WhatsApp Group

Join Now