Today Horoscope | आज 18 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील उदय तिथी व पौर्णिमा आहे. पहाटे 8 वाजून 05 मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी चालेल, त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होईल. तसेच आज गंड योग जुळून आला आहे. आज राहू काळ दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल. त्याचबरोबर यावर्षी आजपासून 18 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष किंवा पितृ पंधरवडा आहे. पितृ पक्षातील हे 15 दिवस हिंदू धर्मात महत्वाचे असतात. (Today Horoscope )
पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध, पिंडदान व तर्पण, असे धार्मिक विधी केल्या जातात. आजपासून पितृपक्ष सुरू होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व वाढले आहे. आजच्या या दिवशी कुणाच्या राशीमध्ये काय असणार, ते पाहुयात.
‘या’ राशीसाठी आजचा दिवस असणार खास
मिथुन रास : आज तुमचे मनोबल वाढीस लागेल. तुमचे जोडीदारासोबतचे संबंध अजून सुधारतील. तुमच्या आर्थिक अडचणी आज दूर होतील. तुमचे सुखाचे दिवस सुरू होतील.
कर्क रास : आजचा दिवस अनुकूल राहील. वरिष्ठांना नाराज करू नका. व्यावसायिक योजना गतिमान होतील. आज तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल.(Today Horoscope )
सिंह रास : प्रतिस्पर्ध्यावर मात कराल. नवीन कामात जपून पाऊले टाका. कुटुंबासोबत आनंदी वेळ व्यतीत कराल. आरोग्याची काळजी घ्या. जास्त चिडचिड करू नका.
कन्या रास : आज तुमच्यावर स्वामींची कृपा राहील. आजचा दिवस प्रसन्न जाईल. खूप दिवसापासून असलेले मतभेद आज दूर होतील. जवळच्या व्यक्तीशी मनातल्या गोष्टी बोलून दाखवाल. आज तुमचा दिवस आनंदी आणि समाधानकारक जाईल. (Today Horoscope )
News Title : Today Horoscope 18 September
महत्वाच्या बातम्या –
पुण्यात गणपती मिरवणुकीला येताय? तर या ठिकाणी करा गाड्या पार्क, मेट्रोचं काय?
‘या’ अभिनेत्रीने पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केला; स्वतः दिली कबुली
मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर






