Today Horoscope | आज 17 सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशी आहे. आजचा हा शुभ दिवस काही राशीसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. 10 दिवस विराजमान असलेले बाप्पा आज निरोप घेणार आहेत. त्याचप्रमाणे आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी देखील आहे. आज रवि योग, धृतिमान योग आणि शतभिषा नक्षत्र यांसारखे शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व वाढले आहे. आता याचा परिणाम कोणत्या राशीवर होणार, ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
वृषभ रास : आज या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासमोर उपलब्ध होतील. आजच्या दिवशी तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळतील. परदेशात शिक्षणासाठी जायला तुम्हाला संधी मिळेल. मुलींना नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल. (Today Horoscope)
सिंह रास : आज तुम्हाला आवडीचे विवाहस्थळ येईल. तुम्हाला आज जुने मित्र देखील भेटतील. तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या आज पूर्ण होतील. तुमच्यावर गणपती बाप्पाचा आशीर्वाद असेल. तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.
वृश्चिक रास : आजचा दिवस फार लाभाचा असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या कामाचे आज योग्य मूल्य ठरेल. तुमच्या कर्तृत्वाला यश मिळेल. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. (Today Horoscope)
धनू रास : या राशीच्या लोकांचा आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती जाणवेल. आज तुम्हाला बढती मिळेल. पगारवाढ होईल. प्रेयसीसोबत फिरायला जायचा प्लॅन ठरेल. आज तुम्ही उत्साही असाल.
कुंभ रास : समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामाची प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला आज मोठा आर्थिक लाभ होईल. मुलींना आवडत्या ठिकाणी जाता येईल. महिलांसाठी आजचा दिवस धावपळीचा असेल. आज तुम्ही हाती घेतलेले सर्व काम यशस्वी होईल.
News Title : Today Horoscope 17 September 2024
महत्वाच्या बातम्या –
PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव
..तर बंद होऊ शकते SSY खाते; सुकन्या समृद्धी योजनेत झाला महत्वाचा बदल
आज अनंत चतुर्दशी, ‘या’ राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा!






