आज अनंत चतुर्दशी, ‘या’ राशींवर राहणार गणपती बाप्पाची कृपा!

On: September 17, 2024 12:26 PM
Today Horoscope 17 September
---Advertisement---

Today Horoscope | आज 17 सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी मंगळवारी रात्री 11 वाजून 45 पर्यंत राहील, त्यानंतर पौर्णिमा तिथीस प्रारंभ होईल. आज राहू काळ दुपारी 3 वाजता सुरु होणार ते संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांपर्यंत असणार. याशिवाय आज आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. आजच्या दिवशी बाप्पा कोणत्या राशीला आशीर्वाद देणार, ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य

मेष रास : मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. नोकरीत स्वत:च्या मुद्यावर ठाम रहा. अनोळखी व्यक्तीचे सहकार्य लाभेल.

वृषभ रास : भावनिक होऊ नका, फसवणुकीपासून सावध रहा. पैशाचा विनिमय विचारपूर्वक करावा. मोठा निर्णय घेताना पुन्हा विचार करावा. (Today Horoscope)

मिथुन रास : व्यावसायिक उन्नती होईल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.

कर्क रास : भाऊ-बहिणीसोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.तुमच्या कलेला वाव मिळेल. अपेक्षित यशासाठी जोरात प्रयत्न करावेत. दूरचे प्रवास संभवतात. (Today Horoscope)

सिंह रास : जुनी कामे मार्गी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी ठरेल. आजचा दिवस चांगला जाईल. कामे मनासारखी झाल्याने मन प्रसन्न आणि आनंदी राहील. आज जवळचा प्रवास योग आहे.

कन्या रास : तुम्हाला आज नव्या संधी मिळतील, त्या संधीचा फायदा घ्या. आज बाप्पाची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सगळी कामे यशस्वी होतील.

तूळ रास : आज तुम्ही तुमच्या निर्णयामुळे छाप पाडाल. तुमचे कर्तृत्व आज दिसून येईल. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल. मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील. (Today Horoscope)

वृश्चिक रास : आजचा दिवस खरेदीचा आहे. घरामध्ये मोठी खरेदी कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कठीण कामे सुरळीत पार पडतील. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.

धनू रास : आजचा दिवस संमिश्र जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न होईल. आज धार्मिक कार्यात मन रमेल.

मकर रास : पैसे खर्च करताना विचार करावा. योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या.आज तुमची अडकलेली पैसे परत मिळतील. तुम्हाला आज जवळची व्यक्ती भेटेल. त्यामुळे आनंदी राहाल.

कुंभ रास : नोकरी करणाऱ्यांना आज बढती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल. तुमचे नेतृत्व कौशल्य उभरून येईल. तुमचा विश्वास वाढेल. (Today Horoscope)

मीन रास : आज गणपती बाप्पा तुमच्या सर्व अडचणी दूर करेल. आजच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे संघर्षाचे दिवस आज फळाला येतील. तुम्हाला आज मोठं यश मिळेल.

News Title : Today Horoscope 17 September

महत्वाच्या बातम्या –

ईशा देओलकडून खुलासा म्हणाली, ‘सेक्सबदल मला….’

दीपिकाचा लेकीसोबतचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

पितृ पक्षात ‘या’ गोष्टी करा; होतील सर्व इच्छा पूर्ण

…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार

पुणे हादरलं! भररस्त्यात गोळीबार अन् पुढे घडल भयंकर

Join WhatsApp Group

Join Now