Today Horoscope | आज 15 ऑक्टोबर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी रात्री 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत राहील. तर दुपारी 2 वाजून 14 मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. तसेच पूर्वा भाद्रपद नक्षत्र रात्री 10 वाजून 09 मिनिटांपर्यंत जागृत असेल. याशिवाय आज मंगळवारी भौम प्रदोष व्रत करण्यात येणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष व शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जातात. आजच्या दिवशी कोणत्या राशीत सुख-समृद्धी येणार, ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज तुम्हाला उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकातील एकोपा वाढीस लागेल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल.
वृषभ रास : नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुम्हाला नवीन संधी प्राप्त होतील, त्या संधीचा फायदा घ्या. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील दाट संभावना आहे.
मिथुन रास : प्रेम सौख्यात वाढ होईल. गायन कलेला योग्य दाद मिळेल. आवडते छंद जोपासले जातील. करमणुकीत अधिक काळ रमाल. शाळेतील मित्रांची भेट होईल. यामुळे प्रसन्न राहाल. (Today Horoscope)
कर्क रास : घरासाठी नवीन वस्तु खरेदी कराल. आवडत्या व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाल. तुम्हाला आज भेटवस्तू मिळेल. धार्मिक ठिकाणी देखील भेट द्याल.
सिंह रास : नातलगांशी जवळीक वाढेल. प्रवासाची हौस भागवता येईल. चांगली कल्पनाशक्ती वाढीस लागेल. हातून एखादे सत्कार्य घडेल.
कन्या रास : आपली इतरांवर छाप पडेल. गोड वाणीने सर्वांना आपलेसे कराल. आर्थिक बाजू सुधारेल. जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. शिक्षणासंबंधी तुम्हाला चांगली संधी मिळेल.
तूळ रास : सर्वांशी मिळून मिसळून वागाल. प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टीकोनातून पहाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. (Today Horoscope)
वृश्चिक रास : क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढावा लागेल. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. सूर्याची उपासना करावी.
धनू रास : आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. तुमचा नोकरीचा शोध पूर्ण होईल. यामुळे आजचा दिवस आनंदी जाईल. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल उचलावे.
मकर रास : आर्थिक बाजू सुधारेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. जोडीदाराशी क्षुल्लक मतभेद संभवतात.
कुंभ रास : चांगली संगत लाभेल. ऐषारामाच्या साधनांची खरेदी कराल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.
मीन रास : मानसिक चंचलता जाणवेल. काही गोष्टी दुर्लक्षित कराव्या लागतील. चांगला धनलाभ संभवतो. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 15 October 2024
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांचा मोठा डाव, अजित पवारांना बसला धक्का
‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’; मुख्यमंत्र्याचं मोठं विधान
उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर
सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींनी आणला होता पेपर स्प्रे? यामागचं धक्कादायक कारण समोर






