या दोन राशींच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होणार!

On: August 14, 2024 10:11 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याची नाहक चिंता कराल. मित्र परिवाराची उणीव जाणवेल. मनावर कसलाही ताण घेऊ नका. स्व‍च्छंदी विचार करावेत. शुभ अंक १, शुभ रंग हिरवा

वृषभ:- नवनवीन गोष्टी वाचनात येतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल. अपचनाचे विकार जाणवू शकतात. विवेकाने परिस्थिती हाताळावी. शुभ अंक ६, शुभ रंग काळा

मिथुन:- पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. योग अथवा व्यायाम करण्यात आळस करू नका. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. प्रेमातील व्यक्तीसाठी उत्तम दिवस. आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक ३, शुभ रंग पोपटी

कर्क:- घरात कटू शब्द वापरू नका. शक्यतो घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. दिवस मध्यम फलदायी राहील. नसते साहस करायला जाऊ नका. शुभ अंक ७, शुभ रंग लाल

सिंह:- परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. संमिश्र घटना जाणवतील. नोकरदार वर्गाला कामाचा ताण जाणवेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. ध्यान धारणा करावी. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अनेक बदल होणार आहेत. शुभ अंक २, शुभ रंग निळा

कन्या:- तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. सामाजिक बांधीलकी जपावी. काही वेळेस सबुरीने वागणे फायद्याचे ठरेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. लाभाच्या संधीकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी

Today Horoscope l तूळ:- कौटुंबिक वातावरण खेळीमिळीच राहील. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. इतरांवर विसंबून राहू नका. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळा. शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी

वृश्चिक:- मनात एक अनामिक भीती राहील. परंतु फार काळजी करण्याचे कारण नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. एकांत हवाहवासा वाटेल. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

धनू:- महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. विरोधक नरमाईने घेतील. मनातील काळजी दूर सारावी लागेल. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत: प्रयत्नशील राहावे. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल. शुभ अंक १, शुभ रंग पिवळा

मकर:- विचारतील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. घरात उगाचच चिडचिड करू नका. कोणाचीही नाराजी पत्करू नका. तुमच्या कामाची पावती मिळण्यास थोडा काळ लागेल. चिकाटी सोडून चालणार नाही. शुभ अंक ५, शुभ रंग पोपटी

कुंभ:- कामात स्थिरता ठेवावी. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. समोरील कामे प्राधान्याने करावीत. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अनंत चांगल्या वाईट बदलांना सामोरे जावे लागेल. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

Today Horoscope l मीन:- खाण्या-पिण्याच्या सवयी बाबत आग्रही राहाल. आवडते छंद जोपासावेत. नकारात्मक विचार टाळावेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल. शुभ अंक २, शुभ रंग हिरवा

News Title : Today Horoscope

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांची तब्येत बिघडली, श्वास घेण्यास अडचण

नीरज चोप्राला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार ऐकून थक्क व्हाल, लगेच करा अर्ज

आता बँकेत जाण्याची गरज संपली; SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज

LIC ची डिजी टर्म इन्शुरन्स योजना काय आहे? जाणून घ्या फायदे व पात्रता

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now