येत्या काही दिवसांत या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळणार

On: May 14, 2024 7:53 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- घरात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. केलेल्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कौटुंबिक खर्च वाढीस लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ७, शुभ रंग लाल

वृषभ:- काम आणि वेळ यांचे योग्य नियोजन करावे. सर्व बाबींचा अंदाज बांधावा लागेल. नवीन विचार अंमलात आणाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. बदलांकडे वेगळ्या नजरेने पहावे. शुभ अंक ३, शुभ रंग पांढरा

मिथुन:- लपवाछपवी करू नका. फसवणुकीपासून सावध राहावे. मनातील नैराश्य काढून टाकावे. क्षणिक गोष्टींचा आनंद घ्याल. वरिष्ठांच्या मर्जीने वागावे. शुभ अंक ६, शुभ रंग जांभळा

कर्क:- मोठ्या लोकांची घरी ऊठबस वाढेल. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घेता येईल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. कामात स्त्रियांची मदत मिळेल. शुभ अंक २, शुभ रंग नारंगी

सिंह:- चारचौघात तुमची कला सादर करता येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. मध्यस्थीच्या कामातून चांगला लाभ मिळेल. जोडीदाराची बाजू विचारात घ्यावी. क्षुल्लक गोष्टींचा त्रास करून घेऊ नका. राजकीय क्षेत्रात यश मिळवाल. शुभ अंक ८, शुभ रंग काळा

कन्या:- मानसिक व्यग्रता जाणवेल. सहकार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. चुगलखोर व्यक्तींपासून दूर राहावे. नातेवाईकांना मदत करावी लागेल. वादातून मानसिक ताण वाढू शकतो. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

तूळ:- योग्य संधीची वाट पहावी. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. स्वभावात काहीसा चीड-चीडे पणा येईल. जोडीदाराविषयी गैरसमज करू नयेत. शुभ अंक ५, शुभ रंग निळा

Today Horoscope l वृश्चिक:- भागीदारीतून चांगला लाभ होईल. शक्यतो प्रवास टाळावा. पत्नीचे वर्चस्व राहील. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. आपल्याच मताचा आग्रह धरू नका. शुभ अंक ४, शुभ रंग लाल

धनू:- जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. नातेवाईकांची योग्य वेळी मदत घेता येईल. भावंडांशी मतभेद संभवतात. शुभ अंक १, शुभ रंग गुलाबी

मकर:- जोडीदाराचे वागणे दुराग्रही वाटू शकते. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. नवीन लोकांच्या ओळखी होतील. घरगुती प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घ्याल. संयम सोडून चालणार नाही. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

कुंभ:- स्वत:चेच म्हणणे खरे कराल. इतरांचे मत देखील विचारात घ्यावे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींचा त्रागा करू नका. आपली छाप पडण्यात यशस्वी व्हाल. येत्या काही दिवसांत राजकीय क्षेत्रात मोठी जबाबदारी पडेल. शुभ अंक ५, शुभ रंग विटकरी

Today Horoscope l मीन:- हातात नवीन अधिकार येतील. तुमच्या कलेला प्रोत्साहन दिले जाईल. कोणाशीही उघड उघड शत्रुत्व पत्करू नका. आपले त्रासाला स्वत:च कारणीभूत होऊ नका. कामातील बदलांकडे लक्ष ठेवावे. शुभ अंक ३, शुभ रंग पांढरा

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या

पावसाचं रौद्ररुप! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

“…असे लोक पुन्हा निवडून यायला नको”; अण्णा हजारे केजरीवालांवर संतापले

बायकोचा राग काढला पोलिसांवर; पुणे शहरात एकच खळबळ

“मला मतदान करु दिले नाही, कारण…”; ‘या’ अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

“असा पंतप्रधान मी पहिल्यांदा पाहिला जो फक्त…”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now