आज सोमवार, महादेवाची ‘या’ राशींवर असणार कृपादृष्टी!

On: October 14, 2024 7:57 AM
Today Horoscope 14 October 2024
---Advertisement---

Today Horoscope | आज 14 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. सोमवारी सकाळी 6 वाजून 42 मिनिटांपर्यंत एकादशी तिथी असेल. तसेच आज सोमवारी 12 वाजून 43 मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. याशिवाय सोमवारी पापंकुशा एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पद्मनाभ रुपाची पूजा केली जाते. आजचा दिवस सर्व 12 राशीसाठी कसा जाईल, ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशी भविष्य

मेष रास : तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेतला जाईल. कोणत्याही वादात अडकू नका. आजचा दिवस ताण-तणावमध्ये जाईल. त्यामुळे होईल तितके डोके शांत ठेवा. चिडचिड करू नका.

वृषभ रास : जोडीदाराचे सान्निध्य व सहयोग लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील संभावना आहे. (Today Horoscope)

मिथुन रास : व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल. आपल्या मौल्यवान वस्तु जपून ठेवा. मुलांच्या यशाने खुश व्हाल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कर्क रास : आवडत्या व्यक्तीची भेट होईल. दिवस लाभदायक ठरणार. आज जवळचा प्रवास योग आहे. स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल.

सिंह रास : व्यावसायिक गोष्टी काळजीपूर्वक करा. जोडीदारासमोर आपले विचार स्पष्टपणे मांडा. दिवस मध्यम फलदायी असेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. (Today Horoscope)

कन्या रास : आज तुमच्यावर महादेवाची कृपा असेल. तुमचे सर्व काम आज पूर्ण होईल. नवीन कार्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

तूळ रास : काही तडजोडी कराव्या लागतील. कामात सहकारी मदत करतील. समाधान मिळवू शकाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृश्चिक रास : कामाच्या ताणाने निराश होऊ नका. आपली चिकाटी कायम ठेवा. शॉर्टकट मार्ग शोधू नका. मेहनत करा. तुम्हाला यश नक्की मिळेल.

धनू रास : घरातील व्यक्तींचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक बाबी शांतपणे हाताळा. जवळचा प्रवास कराल.

मकर रास : आज तुम्ही स्वतःसाठी  आवडत्या वस्तूंची खरेदी कराल. आर्थिक स्थिती ठीक राहील. जिद्द व चिकाटी कायम ठेवावी. भावंडांशी मतभेद संभवतात. (Today Horoscope)

कुंभ रास : तुम्ही घेतलेल्या कष्टाचे तुम्हाला चांगले फळ मिळेल.सकारात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात वाद टाळावेत.

मीन रास :  एखाद्या गोष्टीचा विचार आज मनात सुरू राहील. कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागणार नाही. मनावर ओझं असल्यासारखे वाटेल.  तुमच्या मनातील गोष्टी तुम्ही जवळच्या व्यक्तीसमोर बोलून दाखवाल. त्यामुळे काही प्रमाणात मन हलके होईल.

News Title : Today Horoscope 14 October 2024 

महत्वाच्या बातम्या-

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरबाबत धक्कादायक माहिती समोर!

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर गँगस्टर रोहित गोदाराचं वक्तव्य चर्चेत!

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील तिसरा आरोपी पुण्यात करत होता नोकरी!

‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ

बिश्नोई गँगकडून सिद्दीकींच्या हत्येचा खुलासा, ‘त्या’ पोस्टमुळे एकच खळबळ

Join WhatsApp Group

Join Now