आज भोलेनाथ ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

On: December 13, 2024 10:47 AM
Today Horoscope 13 December 2024
---Advertisement---

Today Horoscope | आज 13 डिसेंबररोजी, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. त्रयोदशी तिथी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 41 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज रात्री 11 वाजून 54 मिनिटांपर्यंत शिवयोग जुळून येईल. आज राहू काळ 1 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 3 वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज प्रदोष व्रत (Pradosh Vrat) केले जातील. या दिवशी भगवान शिव (Lord Shiva) आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.प्रदोष व्रताच्या दिवशी व्रत ठेवल्याने सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. आजच्या या दिवशी तुमच्या नशिबात कसं सुखं येईल ते पाहुयात. (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य-

मेष:- आज तुमच्या आयुष्यात एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.

वृषभ:- तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आज तुम्हाला जवळचे मित्र भेटतील. गप्पा-गोष्टी रंगतील. (Today Horoscope)

मिथुन:- मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. प्रगतीला चांगला वाव मिळेल.

कर्क:- हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करिअर विषयी चिंता वाटू लागेल. एकांतमध्ये राहायला पसंत कराल.

सिंह:- मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यावसायिकांना आजचा दिवस फायद्याचा ठरेल.

कन्या:- तुम्हाला आज जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंदी आणि प्रसन्न जाईल. (Today Horoscope) आज तुमच्यावर महादेवाची कृपा असेल.

तूळ:- आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यावर नवी जबाबदारी पडेल.

वृश्चिक:- कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल. तुमचे सुखाचे दिवस येतील.

धनू:- धार्मिक कामासाठी खर्च कराल. तुम्हाला आज शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मकर:- धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. (Today Horoscope)

कुंभ:- आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा. नवीन गोष्टी शिकायला मिळतील.

मीन:- प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे. तुम्हाला आज नोकरीच्या नव्या संधी मिळतील.

News Title – Today Horoscope 13 December 2024

महत्वाच्या बातम्या :

पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?

अजितदादांची धाकधूक वाढली! भाजप अजितदादांना देणार दे धक्का?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! यापुढे ‘एक देश, एक निवडणूक’ …?

नवीन राजकीय समिकरणं जुळणार? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन; ‘या’ विषयावर झालं बोलणं

शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरामुळे केंद्राकडे केली मोठी मागणी!

Join WhatsApp Group

Join Now