आजचे राशीभविष्य! कुंभ, मकर व तुळसह ब्रह्म योगात ‘या’ राशींचं भाग्य उजळणार

On: January 12, 2025 7:59 AM
Today Horoscope 12 January 2025
---Advertisement---

Today Horoscope 12 January 2025 | आज 12 जानेवारीरोजी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. चतुर्दशी तिथी रविवारी संपूर्ण दिवस आणि सोमवारी पहाटे 5 वाजून 03 मिनिटांपर्यंत राहील. 12 जानेवारीला ब्रम्ह योग सकाळी 9 वाजून 9 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर इंद्र योग जुळून येईल. आजच्या दिवशी ब्रह्म योगात काही राशींचं नशीब उजळून निघणार आहे. आता त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात. (Today Horoscope 12 January 2025)

आजचे राशीभविष्य

मेष:- आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. आज तुमच्या मनातील काही इच्छा सत्यात देखील उतरतील. आजचा दिवस उत्साही आणि आनंदी जाईल.

वृषभ:- घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. करमणुकीकडे कल वाढेल. हातातील कामात यश येईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

मिथुन:- कामातील अपेक्षितता वाढेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मौल्यवान वस्तु खरेदी कराल. दिवस चांगला जाईल. आज तुमचा संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साही जाईल.

कर्क:- उधारीचे पैसे वसूल होतील. धनवृद्धीचे योग जुळून येतील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. आज तुम्हाला विवाहासाठी देखील योग्य स्थळ चालून येईल.

सिंह:- आरोग्याच्या समस्या दूर होतील. आवडत्या जेवणाचा आस्वाद घ्याल. लांबच्या ठिकाणी प्रवासाला जाल. कुटुंबासोबत सुट्टी एंजॉय कराल. (Today Horoscope 12 January 2025)

कन्या:- खर्च समाधानकारक असेल. मानसिक शांतता लाभेल. वैवाहिक जीवन संमिश्र राहील. काही गोष्टी जुळवून घ्याव्या लागतील. आजचा दिवस थोडा धावपळीत जाईल.

तूळ:- आपले मत मांडताना थोडासा विचार करावा. काही गोष्टी लपवण्याकडे कल राहील. जोडीदाराचे उत्तम सान्निध्य लाभेल.

वृश्चिक:- झोपेची तक्रार जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. बोलताना तारतम्य बाळगा. जास्त राग-राग केल्यास तोटा होऊ शकतो.

धनू:- घरासाठी खरेदी केली जाईल. आनंदाची अनुभूति घ्याल. सांसारिक सौख्यात वाढ होईल. आवडत्या व्यक्तीसोबत आजचा दिवस व्यतीत कराल.

मकर:- अचानक तुम्हाला आज धनलाभ होऊ शकतो. आज तुम्हाला नोकरीसाठी देखील कॉल येऊ शकतो. घरात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल. गोड बोलून कामे करून घ्याल.

कुंभ:- जुने प्रश्न मार्गी लावाल. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्यावे. आजचा दिवस आनंदी जाईल. आज तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. (Today Horoscope 12 January 2025)

मीन :- वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तणाव दूर होऊ शकेल. आज जवळचा प्रवास योग आहे, त्यामुळे वाहने सावकाश चालवा.

News Title : Today Horoscope 12 January 2025

महत्वाच्या बातम्या –

“धनंजय मुंडे तुमची टोळी थांबवा”, अन्यथा….; जरांगे पाटलांचा इशारा

संतोष देशमुखांची हत्या ‘इतक्या’ कोटींसाठी केली, सुरेश धसांचा हल्लाबोल

“…तरच सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवरील मोक्का टिकेल”, वकील नेमकं काय म्हणाले?

केस कापायला आता मोजावे लागणार इतके पैसे, सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका!

बस अचानक सुरु झाली अन् पुढं घडलं भयंकर!

Join WhatsApp Group

Join Now