या राशीच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये यश मिळेल

On: April 12, 2024 7:40 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- अतीविचार करू नका. मैत्रीचे संबंध जपावेत. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घरात तुमच्या मताला वजन प्राप्त होईल. मानसिक चंचलता जाणवेल. शुभ अंक ३, शुभ रंग नारंगी

वृषभ:- सर्वांशी गोडीने वागाल. कामाचा व्याप लक्षात घ्यावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक ५, शुभ रंग पिवळा

मिथुन:- कामात चालढकल करू नका. एकाच वेळी अनेक कामे अंगावर येऊन पडतील. वेळेचे महत्व लक्षात घ्या. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा. शुभ अंक २, शुभ रंग लाल

Today Horoscope l कर्क:- व्यावसायिक वाढीचे नियोजन आखाल. कामातून अपेक्षित लाभ मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. वैवाहिक सौख्य जपावे लागेल. छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा

सिंह:- कामाचा आवाका वाढू शकतो. आळस झटकून टाकावा लागेल. कमिशनमधून मिळणारा फायदा लक्षात घ्यावा. कामाच्या ठिकाणी आपली पत जपावी. शुभ अंक ६, शुभ रंग विटकरी

कन्या:- जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. आपले संपर्क क्षेत्र वाढेल. वडीलधार्‍या व्यक्तींचा विरोध होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

तूळ:- नातेवाईकांशी सलोखा जपता येईल. कामात समाधान मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अतीउत्साह दर्शवू नका. शुभ अंक १, शुभ रंग पांढरा

वृश्चिक:- मित्रांशी मतभेदाची शक्यता आहे. करमणुकीची साधने शोधाल. प्रवासात किरकोळ अडचण येऊ शकते. मुलांच्या आनंदात रमून जाल. शुभ अंक ३, शुभ रंग गुलाबी

धनू:- घरगुती वातावरणात दिवस चांगला जाईल. मनाजोगी कामे करण्यात दिवस व्यतीत कराल. बाहेरील हातातील कामात यश येईल. कचेरीची कामे निघतील. शुभ अंक ५ , शुभ रंग निळा

Today Horoscope l मकर:- कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या विचारांचा आदर राखला जाईल. इतरांसोबत बोलतांना कोणी विच्रार करून बोलावे. शेअर मार्केट करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. शुभ अंक ४, शुभ रंग हिरवा

कुंभ:- नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. आततायीपणे वागणे चुकीचे ठरेल. प्रवास काळजीपूर्वक करावा. शांतपणे विचार करण्याला प्राधान्य द्या. शुभ अंक ८, शुभ रंग निळा

मीन:- भावंडांचे वागणे रूचणार नाही. उगाचच टिप्पणी करायला जाऊ नका. सामोपचाराचे धोरण ठेवा. संपूर्ण विचारांती निर्णय घ्यावा. शुभ अंक ९, शुभ रंग जांभळा

News Title : Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

‘पुण्यात भाऊ, तात्या नाहीतर अण्णाच निवडून येणार’; एकनाथ शिंदेंना विश्वास

आकाश अंबानी-रोहित शर्माचा एकाच गाडीतून प्रवास; हार्दिकचा पत्ता कट होणार?

“कोल्हापूरचे शाहू महाराज हे खरे महाराज नाहीत”; संजय मंडलिकांचा तोल सुटला

प्रचार करताना भाजप उमेदवाराने जबरदस्तीने घेतला महिलेचा मुका!

उन्हाळ्यात ‘ही’ फळे आवर्जून खायला हवीत!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now