सोने आणि चांदीने उडवली ग्राहकांची झोप; जाणून घ्या आजचा दर

On: September 28, 2024 10:47 AM
Gold Rate
---Advertisement---

Gold Rate l गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. कारण सध्या सोने आणि चांदीच्या किंमतीत दरवाढीचे सत्र गेल्या कित्येक दिवसांपासून सुरूच आहे. त्यामुळे या मौल्यवान धातुत दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात देखील या दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली होती. तर या आठवड्यात देखील दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. तर आज आपण आजच्या बाजारभावाप्रमाणे या दोन्ही धातूंचे दर काय आहेत हे जाणून घेऊयात…

जाणून घ्या आजचा सोन्याचा दर :

सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सोने आणि चांदीच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आता स्वस्ताईचे चिन्हे काही दिसत नाहीत. बाजारातील तज्ज्ञानुसार, आता पुढील काळ हा सणासुदीचा असल्याने आणि तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरु होणार आहे. त्यामुळे या धातूत नरमाईची शक्यता कमी असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय येत्या काळात हे दोन्ही धातू लवकरच सर्वकालीन उच्चांक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या दोन आठवड्यात सोन्याने तब्बल 2,000 रुपयांहून अधिकची मुसंडी मारली आहे. तसेच 23 सप्टेंबर रोजी दर 220 रुपये, 24 सप्टेंबर रोजी 210 रुपये तर 25 सप्टेंबरला 660 रुपयांनी सोन्याच्या किंमती वधारल्या होत्या. याशिवाय 26 सप्टेंबरला सोन्याचा भाव हा स्थिर होता. तर 27 सप्टेंबर रोजी सोन्याचे दर 430 रुपयांनी वधारले होते. अशातच आजच्या बाजारभावाप्रमाणे, आज 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate l चांदीचे दर काय? :

गेल्या दोन आठवड्यामध्ये चांदीने तब्बल 6,000 रुपयांची मुसंडी मारली आहे. तर 22, 23 आणि 24 सप्टेंबरला किंमतीत देखील वाढ झाली नाही. अशातच आता 25 सप्टेंबर रोजी चांदीत तब्बल 2,000 रुपयांची वाढ झाली आहे.

आज सकाळच्या सूत्रानुसार, आज एक किलो चांदीचा भाव हा 91,448 रुपये इतका झाला आहे. तसेच वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क नसते. याशिवाय सराफा बाजारात शुल्क आणि कराचा देखील समावेश होत असल्याने बाजार भावात तफावत दिसून येते.

News Title : Today Gold Rates

महत्वाच्या बातम्या –

कुंभसह ‘या’ राशींना आज मिळणार शुभवार्ता, वाचा राशीभविष्य!

सोनं-चांदी सुसाट, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ; जाणून घ्या आजचे भाव

महिन्याच्या शेवटी दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली घसरण?

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंची बाजी, युवासेनेने उडवला अभाविपचा धुव्वा

आज शनीदेव ‘या’ राशींच्या जीवनात धन-सुखाचा पाऊस पाडणार!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now