Today Gold Rate l आज गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. बाप्पाचे आगमन होताच सोने व चांदी या धातूंनी दरवाढीचा मुहूर्त साधला आहे. कारण गेल्या दोन आठवड्यापासून ग्राहकांना सोने आणि चांदीने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला होता. पण गणपती बाप्पाचे आगमन होताच दोन्ही धातूंचे दर वाढले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या मध्यंतरी दोन्ही धातूत मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात देखील कोणतीही दरवाढ झाली नाही. मात्र अशातच आज या दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली आहे. या धातूंच्या उसळीनंतर सोने व चांदीच्या किंमती काय आहेत हे आपण जाणून घेऊयात…
बाप्पाचे आगमन होताच दोन्ही धातूंनी साधला दरवाढीचा मुहूर्त :
सप्टेंबर महिन्यातील पहिल्या पाच दिवसात सोन्याच्या किमतीत फारसा मोठा बदल दिसला नाही. कारण 2, 3 आणि 4 सप्टेंबरला सोन्याचे दर कमी झाले होते. अशातच 2 सप्टेंबर रोजी सोने तब्बल 270 रुपयांनी उतरले होते. तर 6 सप्टेंबर रोजी सोन 550 रुपयांनी वाढलं होत.
अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याचे दरवाढीचे संकेत मिळत आहेत. आजच्या बाजारभावाप्रमाणे आता 22 कॅरेट सोने 67,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 73,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Today Gold Rate l चांदीच्या दरात वाढ :
गेल्या दोन आठवड्यापासून चांदीच्या दरात मोठी दरवाढ झाली नव्हती. अशातच आता या आठवड्यात 2 आणि 4 सप्टेंबर रोजी चांदीचे भाव हे तब्बल 2 हजारांनी घसरले होते. तसेच 6 सप्टेंबर रोजी चांदीने तब्बल 2 हजारांची उसळी घेतली होती. अशातच आज सकाळच्या सत्रात चांदीच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.
आज सकाळच्या सत्रात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने हे 71,931 रुपये , तसेच 10 ग्रॅम 23 कॅरेट 71,643 रुपये व 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 65,889 रुपयांवर आहे. तसेच आजकाल ग्राहक सोन्याचे व चांदीचे भाव हे घरबसल्या देखील जाणून घेऊ शकतात.त्यासाठी ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव अगदी मोबाईलवर जाणून घेऊ शकतात.
News Title : Today Gold Rate
महत्वाच्या बातम्या-
खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र
आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण
विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट
गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस






