सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार? जाणून घ्या आजचा तोळ्याचा भाव

On: September 2, 2024 12:14 PM
Gold Rate
---Advertisement---

Today Gold Rate l ऑगस्ट महिना हा सोने व चांदीसाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे. कारण ऑगस्ट महिन्यात सोनीच्या व चांदीच्या भावामध्ये अनेकवेळा चढउत्तर पाहायला मिळाले आहेत. अशातच या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात देखी काही प्रमाणात चढउतार दिसले आहेत. अशातच आता सप्टेंबर महिन्यापासून दिवाळीपर्यंत एका पाठोपाठ सण आहेत. या सणावाराच्या काळात सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सणासुदीला धातूंचा भाव वधारतो, हे एकप्रकारे बाजाराचं समीकरणच आहे. अशातच आता अमेरिकन फेडरल बँकेने अनेक दिवसानंतर व्याजदरात कपात होण्याचा संकेत दिला आहे. तसेच फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी दिलेल्या संकेतानुसार, व्याजदरात 1 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे परिणामी दोन्ही धातूचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. अशातच आज सोने आणि चांदीचा भाव काय आहे हे जाणून घेऊयात?

Today Gold Rate l आजचा सोन्याचा दर काय आहे? :

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे फक्त 28 ऑगस्ट रोजीचं सोने महागले होते. या दिवशी सोने 210 रुपयांनी महागले होते. त्यानंतर सोन्यात इतर दिवशी किंचित प्रमाणात घसरण झाली होती. अशातच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी 22 कॅरेट सोने 67,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

याशिवाय चांदीमध्ये 27 ऑगस्ट रोजी तब्बल 600 रुपयांची दरवाढ झाली होती. तर 26 आणि 30 ऑगस्ट रोजी तब्बल 600 रुपयांची घसरण देखील झाली होती. मात्र इतर दिवशी चांदीच्या भावात कोणताच बदल झाला नाही. अशातच आज एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव : 

आजकाल नागिरकांना सोने-चांदीच्या किंमती घरबसल्या देखील जाणून घेता येतील. मात्र करामुळे शहरानुसार किंमतीत काही प्रमाणात तफावत दिसून येते. अशातच इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे या धातूंचे भाव जाहीर करत असते.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या व यामध्ये शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येत असतात. त्यासाठी ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Today Gold Rate

महत्वाच्या बातम्या-

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यावर आले की नाही? अशाप्रकारे चेक करा

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, आजही धो-धो बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट

मराठवाड्यात पावसाचा कहर! नांदेड, यवतमाळ व हिंगोलीत अतिवृष्टी, अनेक नद्यांना पुर

वनराज आंदेकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट; गोळीबाराचा VIDEO आला समोर

पुण्यात राष्ट्रवादी नेत्याची गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी तीन जणांना घेतलं ताब्यात

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now