Gold Rate l रक्षाबंधनानंतर सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. कारण मागच्या आठ दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण होत होती. मात्र आता सोन्याने भरारी घेतली आहे. तर आज सोन्याचे दर काय आहेत हे आपण जाणून घेऊयात…
सोन्याचे दर वाढले :
आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुने भरारी घेतली आहे. कारण सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. यासोबतच चांदीने देखील उसळी घेतली आहे. आज सोनं तब्बल 550 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे प्रतितोळा 73,200 रुपये इतके आहेत.
सोन्यासोबतच चांदीने देखील भावात वाढ केली आहे. आज चांदीच्या दरात आज 153 रुपयांनी वाढ झाली आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे चांदी 84,883 रुपये आहे. मात्र आता सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा 75 हजारांवर पोहोचण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Gold Rate l येत्या काही दिवसात सोन्याचे दर गगनाला भिडणार :
जागतिक बाजारभावाप्रमाणे, सोन्याच्या किमतीत सर्वाधिक नोंद झाली होती. स्थानिक सराफ बाजारात काल (२० ऑगस्ट) सोन्याचा भाव 1,400 रुपयांनी वाढून तब्बल 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मात्र शुक्रवारी शेवटच्या व्यवहारात सोन्याचे दर हे 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. यासह चांदीचा भाव देखील 3,150 रुपयांनी वाढून 87,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.
मुंबई आणि पुण्यात सोन्याचे दर काय आहेत? :
22 कॅरेट सोनं – 67,100 रुपये
24 कॅरेट सोनं – 73,200 रुपये
18 कॅरेट सोनं – 54, 900 रुपये
News Title : Today Gold Rate
महत्त्वाच्या बातम्या-
युवराज सिंगच आयुष्य उलगडणार मोठ्या पडद्यावर; कोणता अभिनेता साकारणार ‘सिक्सर किंग’ची भूमिका?
राज्यात पुन्हा पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
हुंदाई कंपनी टाटा सफारीला देणार टक्कर; होणार भन्नाट कार लाँच
पुण्यातील ‘या’ बड्या नेत्याला ईडीकडून अटक; घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड
फडणवीसांना मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवार गटाच्या मार्गावर?






