महागाईचा झटका बसणार? ‘या’ वस्तू महागणार

On: December 20, 2024 11:08 AM
GST Rate Cut 2025
---Advertisement---

GST Hike l गेल्या काही दिवसांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत आहे. अशातच आता पुन्हा एक महागाईचा झटका देणारी बातमी समोर आली आहे. आता तंबाखूसह सिगारेट देखील महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व वस्तूवर वस्तू आणि सेवा कर (GST ) वाढवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मृत्यूचे प्रमाण घटण्याची शक्यता :

तंबाखू उत्पादनावर तब्बल 35 टक्के टॅक्स लावण्याची शिफारस सध्या केली जात आहे. कारण सध्या हा दर 28 टक्के इतका आहे. मात्र आता या वाढीमुळे सिगारेट, तंबाखूचा वापर देखील कमी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याशिवाय तंबाखू, सिगारेटचा वापर देखील कमी होणार आहे. तसेच या किंमतीत वाढ झाल्याने त्याचा वापर करणाऱ्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे. तसेच आता या निर्णयामुळे लोक तंबाखू आणि सिगारेटचा वापर कमी करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील घटण्याची शक्यता आहे.

GST Hike l कोणत्या वस्तू स्वस्त होणार? :

दरम्यान, तंबाखू आणि सिगारेटवरील टॅक्स वाढवल्यावर जमा होणारा महसूल हा आरोग्य सेवेवर खर्च करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय कॅन्सर संस्थानच्या प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे हे एक महत्वाचे पाऊल जगभरात प्रभावी ठरणार आहे.

याशिवाय तंबाखूसह कोल्ड्रिंक आणि इतर वस्तूंवर देखील 35 टक्के नवीन टॅक्स स्लॅब सुरू करण्याची शिफारस केली आहे. तसेच नोटबुक, बाटलीबंद पाणी, सायकल यासारख्या आवश्यक वस्तूंवर GST Rates कमी करण्याची शिफारस केली तर आरोग्य आणि जीवन विम्यावरील हप्ता देखील कमी करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

News Title:  tobacco cigarettes will become expensive

महत्त्वाच्या बातम्या –

“जास्त हुशार्‍या मारू नका, मी पुन्हा येईन”; शिंदेंच्या ‘या’ आमदाराचं सूचक वक्तव्य

शरद पवार गटातील ‘हा’ बडा आमदार अजितदादांच्या भेटीला, चर्चेला उधाण

मारहाण व मराठी भाषेला हिणवणाऱ्या शुक्लाला अटक करा अन्यथा…; मनसे आक्रमक

“मराठी माणसं भिकारी, तुमचं मराठीपण काढतोच”; म्हणत हिंदी भाषिक अधिकाऱ्याकडून मारहाण, नेमकं काय घडलं?

आज ‘या’ राशींवर असणार स्वामींची विशेष कृपा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now