‘तिचे ७ पुरुषांसोबत संबंध, दारूचा नाद, बायको मला मारून टाकेल’; नवऱ्याची पोलिसात धाव

On: April 26, 2025 1:00 PM
Crime New
---Advertisement---

Uttar Pradesh | उत्तर प्रदेशातील मेरठ (Meerut) येथे एका पतीने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप करत तिच्यापासून जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. पत्नीचे ७ पुरुषांसोबत अवैध संबंध असून, ती प्रियकरांच्या मदतीने ४० लाखांच्या विम्यासाठी आपला खून करू शकते, अशी भीती गौरव शर्मा (Gaurav Sharma) नावाच्या व्यक्तीने व्यक्त केली आहे.

‘पत्नी जीवावर उठलीय’

मेरठमधील (Meerut) एका प्रकाशन संस्थेत व्यवस्थापक असलेल्या गौरव शर्माने (Gaurav Sharma) एसएसपी (SSP) कार्यालयात धाव घेत पत्नी रितांशी शर्मा उर्फ रितू (Ritanshi Sharma alias Ritu) विरोधात निवेदन दिले आहे. पत्नीला ड्रग्जचे व्यसन आहे, तिच्याकडे शस्त्रे आहेत आणि तिचे अनेक पुरुषांशी संबंध आहेत, असा दावा गौरवने (Gaurav Sharma) केला आहे.

नुकत्याच गाजलेल्या मुस्कान-सौरभ (Muskan-Saurabh) हत्या प्रकरणाचा संदर्भ देत, गौरवने (Gaurav Sharma) भीती व्यक्त केली की, त्याची पत्नी रितांशी (Ritanshi Sharma) देखील तिच्या प्रियकरांच्या मदतीने त्याची हत्या करू शकते. सोशल मीडियावर त्याच्या हत्येचा कट रचला जात असून, उद्देश ४० लाखांचा प्रवास विमा हडपणे हा आहे, असा आरोप त्याने केला आहे.

पुतण्याने सांगितली घरातली गोष्ट, सोशल मीडियावर पुरावे?

गौरव (Gaurav Sharma) आणि रितांशी (Ritanshi Sharma) यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. पत्नीच्या शिवीगाळ आणि मारहाणीच्या सवयीमुळे व ती घरातून न सांगता निघून जात असल्याने गौरवला कुटुंबापासून वेगळे राहावे लागले. पत्नी अनेक दिवस गायब असायची आणि घरी नसताना तिच्या पुरुष मित्रांसोबत पार्ट्या करत असल्याची माहिती गौरवला (Gaurav Sharma) मिळाली.

खात्री करण्यासाठी त्याने १२ वर्षांच्या पुतण्या वंश शर्मा उर्फ बल्लूला (Vansh Sharma alias Ballu) घरी ठेवले. पुतण्याने सांगितले की, काका बाहेर गेल्यावर घरात अनोळखी लोक येऊन काकूसोबत (रितांशी) (Ritanshi Sharma) अश्लील गप्पा मारत, मद्यपान करत. त्यानंतर गौरवने (Gaurav Sharma) पत्नीचा फोन तपासला असता, इंस्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook), स्नॅपचॅटवर (Snapchat) आशिष उर्फ सनी (Ashish alias Sunny), राज वर्मा (Raj Verma), लव चौहान (Luv Chauhan), कुलदीप उर्फ कुक्की (Kuldeep alias Kukki) आणि अमन सिंग (Aman Singh) यांच्याशी अवैध संबंधांचे पुरावे मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. १२०० पानांचे स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ पुरावा म्हणून असल्याचे तो म्हणाला.

Title : Meerut Man Fears Wife Will Kill Him Like Muskan Case

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now