Tirupati Laddu Controversy l गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद प्रकरणी महत्वाची बातमी आहे. या भेसळयुक्त लाडू प्रकरणी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात भेसळ केल्याच्या प्रकारावर आता रामनाथ कोविंद यांनी चिंता व्यक्त केली आहे. मंदिरातील प्रसाद हे एक श्रद्धेचे प्रतिक आहे. पण त्यात भेसळ होत असल्याने भाविक भक्तांच्या मनात शंका उपस्थित होत आहे.
भाविकांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतिक :
“याप्रकरणी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, भेसळ करणे हे तर पाप आहे. तसेच हिंदू धर्मग्रंथात अशा भेसळीला पापच म्हटले आहे. भाविकांसाठी प्रसाद हे श्रद्धेचे प्रतिक आहे. त्यामध्ये अशी भेसळ करणे निंदनीय आहे.” आता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या या टिप्पणीमुळे आता पुन्हा हा वाद ऐरणीवर आला आहे. याशिवाय अनेक भाविकांनी प्रसादाच्या तपासाची मागणी केली आहे. तर अनेक देवस्थानांमधील प्रसाद यामुळे रडारवर आला आहे.
दरम्यान तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या वादावरुन राजकारण अधिकच तापत आहे. मात्र आंध्र प्रदेशमध्ये हा मुद्दा प्रचंड ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारने देखील याप्रकरणी हस्तक्षेप केला आहे. सुरुवातीचे काही अहवाल समोर आल्यानंतर देवस्थानचे व्यवस्थापन करणारे सर्वच जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले होते. तर तुपाचा पुरवठा करणारी कर्नाटकची कंपनी आणि इतर काही जण पण चिंतेत आले आहेत.
Tirupati Laddu Controversy l या केंद्रीय मंत्र्यांनी केली चौकशीची मागणी :
तिरुपती लाडू प्रकरणी भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आंध्र प्रदेश सरकारकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
तसेच या प्रकरणाचे गांभीर्य पाहता एक विशेष समिती गठीत करणे आवश्यक आहे. तसेच या समितीच्या अहवालानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी देखील त्यांनी केली. हा हिंदूच्या श्रद्धेवर आणि विश्वासावर थेट आघात करण्याचा विषय आहे, मात्र तो सहन करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
News Title : Tirupati Laddu Controversy
महत्त्वाच्या बातम्या-
बिग बॉस मराठी 5 बंद होणार? ‘या’ तारखेला होणार ग्रँड फिनाले
‘या’ बातमीत दडलाय वजन कमी करण्याचा रामबाण उपाय; डाएट, जीम न लावता व्हाल स्लिम
टीम इंडियाच्या प्रिन्सने बांगलादेशला धु धु धुतलं… ‘या’ दिग्ग्ज खेळाडूंना टाकलं मागे
निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?
ऐश्वर्या राय आणि सलमानबद्दल ‘या’ अभिनेत्रीकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!






