तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत ‘या’ जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; राम मंदिरात वाटप

On: September 21, 2024 11:42 AM
Tirupati Laddu Controversy
---Advertisement---

Tirupati Laddu Controversy l आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात प्रसादाच्या लाडू वरून वाद सुरू आहे. या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल असल्याचे समोर आले आहे. यानंतर तमाम हिंदू भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या मंदिरावर कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हाही हा प्रसाद रामललाच्या विग्रह प्राण प्रतिष्ठेसाठी आणण्यात आला होता, ज्याचे भक्तांना वाटप करण्यात आले होते.

तिरुपती मंदिरातून प्रसाद अयोध्येत पाठवला होता :

यावर्षी 22 जानेवारीला अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात भगवान रामललाला अभिषेक करण्यात आला. यावेळी देशातील प्रसिद्ध मंदिरांमधून विविध साहित्य पाठविण्यात आले. यापैकी तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने मंदिराचा लाडू प्रसाद पाठवला होता. हा प्रसाद विशेष विमानाने अयोध्येत आणण्यात आला जो भाविकांमध्ये वाटण्यात आला होता. मात्र आता त्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरात असल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

तिरुपती ट्रस्टने अयोध्येला तीन टन म्हणजेच एक लाख लाडू पाठवल्याचा दावा करण्यात आला आहे. अयोध्या विमानतळावर महापौर महंत गिरीशपती त्रिपाठी आणि इंडिया थिंक कौन्सिलचे संचालक सौरभ पांडे यांनी या प्रसादाचे स्वागत केले. राम मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये हा प्रसाद वाटण्यात आला. हा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

Tirupati Laddu Controversy l तिरुपती मंदिराच्या प्रसादात भेसळ :

याबाबत श्री रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ट्रस्टचे सदस्य अनिल कुमार मिश्रा यांनी सांगितले की, तिरुपती मंदिरातून लाडू आले की नाही हे मला माहीत नाही. मात्र, विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी गोपाल राव यांनी तिरुपतीहून प्रसाद आल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती मंदिराच्या प्रसादात भेसळ असल्याचा दावा केला होता. यासाठी टीडीपीने मागील वायएसआरसीपी सरकारला जबाबदार धरले आहे. तर जबाबदार अधिकारी हे आरोप पूर्णपणे फेटाळत आहेत.

News Title : Tirupati Laddu Controversy

महत्त्वाच्या बातम्या-

मुलीला कन्या दिनानिमित्त द्या हटके शुभेच्छा; होईल खुश

CIDCO ची घरे झाली स्वस्त, नवी मुंबईसाठी ‘या’ तारखेला निघणार लॉटरी

राज्यावर परतीच्या पावसापूर्वी मोठं संकट, IMD ने दिला महत्वाचा इशारा

मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

आज संकष्टी चतुर्थीला बाप्पा ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now