Tilak Varma Controversy l आयपीएल 2025 मध्ये झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात एक निर्णय चर्चेचा विषय ठरला. तिलक वर्माला 19व्या षटकात रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला. मात्र, या वादावर आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
तिलक वर्माने 23 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या, पण फटकेबाजी करण्यात तो अपयशी ठरत होता. यामुळे त्याला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं जयवर्धने यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की, “हा निर्णय कठीण होता, पण संघाच्या गरजेनुसार योग्य ठरला.”
तिलकचा खेळ संथ, त्यामुळेच निर्णय :
महेला जयवर्धने पुढे म्हणाले, “तिलक वर्मा सुरुवातीला सूर्या यादवला चांगली साथ देत होता. मात्र नंतर तो धावांची गती वाढवू शकत नव्हता. आम्हाला शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा करणारा फलंदाज हवा होता. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.”
तिलकची लय सापडत नव्हती आणि तो फक्त दोन चौकारांसह 25 धावा करून खेळत होता. त्यामुळे संघाच्या रणनीतीनुसार नवीन फलंदाजाला संधी देणं गरजेचं झालं होतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Tilak Varma Controversy l हार्दिक पंड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर :
तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय हार्दिक पंड्याच्या सांगण्यावरून घेण्यात आला, असा आरोप सोशल मीडियावर होत आहे. अनेकांनी त्याला “खेळाडूंवर अन्याय करणारा कर्णधार” म्हटलं. मात्र, प्रशिक्षक जयवर्धने यांच्या स्पष्टीकरणानंतर हा निर्णय संघहिताचाच भाग होता, हे स्पष्ट झालं आहे.
तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करणं हा सहज निर्णय नव्हता. मात्र, IPL सारख्या तगड्या स्पर्धेत रणनीती आणि जलद निर्णय याला प्राधान्य दिलं जातं. महेला जयवर्धने यांचं स्पष्टिकरण म्हणजे हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सवर होत असलेल्या टीकेला एक सडेतोड उत्तर ठरू शकतं.






